गुरु तेग बहादूर यांचा ४०० वा प्रकाश पर्व, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरू तेग बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाश पर्वानिमित्ताने रात्री ९.३० वाजताच्या सुमारास देशाला संबोधित करणार आहेत. स्वातंत्र्य दिनाव्यतिरिक्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचे हे दुसरे भाषण असणार आहे. या शुभ दिनी ४०० ‘रागी’ (शीख संगीतकार) शब्द किर्तन करणार आहेत. या कार्यक्रमाचं आयोजन केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने केलं आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीच्या सहकार्याने हे आयोजन केलं जात आहे. या सोहळ्याला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपखंडातील आणि विदेशातील महत्त्वाचे पाहुणे येणार आहेत. आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत प्रकाश पर्व सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्यानिमित्त एक विशेष नाणं आणि टपाल तिकीटही जारी करणार आहेत. त्याची किंमत ४०० रुपये एवढी असेल. गुरु तेग बहादूर यांचा जन्म १६२१मध्ये गुरू महल, अमृतसर इथे झाला होता. दिल्लीत ज्या ठिकाणी गुरू तेग बहादूर शहीद झाले होते. तिथेच त्यांची समाधी आहे. या ठिकाणी त्यांचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारो श्रद्धाळू येत असतात. गुरू तेग बहादूर हे शीखांचे नवे गुरू होते.

गुरू तेग बहादूर हे शीखांचे नवे गुरू होते. गुरू नानक यांनी सांगितलेल्या मार्गाचा त्यांनी अवलंब केला. इस्लामचा स्वीकार केला नाही म्हणून औरंगजेबाने सर्वांसमोर १६७५मध्ये त्यांचे मुंडके उडवण्याचा आदेश दिला होता. मानवी मूल्य, आदर्श आणि सिद्धांतासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ते गुरु होते.

यापूर्वी २०१८ मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारच्या स्थापनेचा ७५ वा वर्धापन दिन साजरा केला होता. त्यावेळी पंतप्रधानांनी सकाळी ९ वाजता देशवासियांना संबोधित केले होते.


हेही वाचा : माझ्या ९० वर्षांच्या आईकडून उद्धव ठाकरेंना निरोप..,किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल