घरCORONA UPDATELockDown: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार; लॉकडाऊनवर फैसला होणार?

LockDown: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार; लॉकडाऊनवर फैसला होणार?

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्याचा कालावधी १४ एप्रिल रोजी संपत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्याचा कालावधी १४ एप्रिल रोजी संपत आहे. मात्र हा लॉकडाऊन सुरू ठेवायचा की संपवायचा याबाबतचा महत्त्वाचा निर्णय आज येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज, शनिवारी ११ वाजता याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. त्यामुळे देशातील परिस्थितीच्या अनुषंकाने ही एक महत्त्वाची बैठक असणार आहे. यापूर्वीच तब्बल ११ राज्यांनी देशातील लॉकडाऊन वाढवण्यात यावा, असे सुचित केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन काढल्यास त्याचा संसर्ग आणखी वाढेल, अशी शक्यताही जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे.

हेही वाचा – गुजरात : ‘आम्हाला पगार द्या’, हजारो कामगार रस्त्यावर’

- Advertisement -

देशात कोरोनाची स्थिती गंभीर 

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी देशातील खासदारांशी चर्चा केली होती. त्या त्या राज्यातील कोरोनासंबंधी तसेच इतर विषयांवरील आढावा बैठक पार पडली होती. खासदारांनीही आपल्या मतदारसंघाची माहिती पंतप्रधांना दिली होती. आता पुन्हा एकदा विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा होत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत ७ हजार ६१८ लोकांना कोरोनाची लागण झाली असून २४९ जणांचा मृत्यू या रोगामुळे झाला आहे. तर ७७४ जण हे बरे झाले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित हे महाराष्ट्रात असून सध्या १ हजार ५७४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर मृतांचा आकडा हा शंभरीपार गेला असून ११० इकता झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती खुपच गंभीर असून येथील लॉकडाऊन विषयी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे या बैठकीनंतर समजू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -