प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर आज (5 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पंतप्रधान मोदी यांनी स्नानावेळची परिधान केलेला पोषाख वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षवेधी ठरला. पण स्नानावेळी पंतप्रधान मोदींनी घेतलेली डुबकी सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. इतकंच नव्हेतर गंगेत डुबकी घेतानाच्या मोदींच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरऱ्यांनी कमेंट्स करत त्यांना ट्रोल केलं आहे. (PM Narendra Modi Troll On Social Media After shahi snan at Maha Kumbh)
माघ अष्टमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभमध्ये पवित्र स्नान केलं. भगवे वस्त्र, गळ्यात रुद्राक्ष माळ घालून मोदींनी संगमात डुबकी मारली. यावेळी त्यांनी काही मंत्रांचा जपसुद्धा केला. त्यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गंगेत डुबकी मारताना आणि जप म्हणतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले. त्यावरून नेटकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रोल केलं आहे. ये कैसी डुबकी है?… जिसमे सिर पानी के ऊपर है? असं म्हणत मोदींना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
ये कैसी डुबकी है?
जिसमे सिर पानी के ऊपर है? pic.twitter.com/nqBPo4aplp
— Srinivas BV (@srinivasiyc) February 5, 2025
श्रीनिवास बीवी या अधिकृत एक्स अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्नान करतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तसेच, या व्हिडीओला ये कैसी डुबकी है?… जिसमे सिर पानी के ऊपर है? असे कॅप्शन दिले आहे. याशिवाय, एका नेटकऱ्याने ‘ये आस्था की नही चुनावी डुबकी ऐसे ही होगी’, असं म्हटलं. तसेच, वॉटरप्रूफ ट्रैक सूट पहन कर कौन सा धार्मिक अनुष्ठान होता है? असंही एका नेटकऱ्यानं एक्सवर पोस्ट केलं आहे.
Ye आस्था की नहीं चुनावी डुबकी ऐसी ही होगी
— Laxminivas Rathi (@RathiLaxminivas) February 5, 2025
वॉटरप्रूफ ट्रैक सूट पहन कर कौन सा धार्मिक अनुष्ठान होता है?
— सुधीर कोरी (@SudhirSinc) February 5, 2025
दरम्यान, कुंभमेळ्यात पवित्र स्नानासाठी वसंत पंचमी आणि मौनी अमावस्यासारखे शुभ दिवस निवडले जातात. परंतु मोदींनी आजचा 5 फेब्रुवारीचा दिवस का निवडला, असा प्रश्न अनेकांना पडला. तर यादिवशी माघ अष्टमी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार भक्ती, दानधर्म, तपश्चर्या यांमध्ये माघ अष्टमी शुभ दिवस मानला जातो. माघ अष्टमी हा माघ महिन्याच्या आठव्या दिवशी येतो. हा दिवस ध्यानसाधना, दान आणि प्रयागराज इथल्या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. अध्यात्मिक विकासासाठी हा दिवस चांगला मानला जातो. 13 जानेवारीपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं महाकुंभ मेळा सुरू आहे. आतापर्यंत तिथल्या संगमात कोट्यवधी लोकांनी पवित्र स्नान केलं आहे.
हेही वाचा – Indrajit Sinha : पक्षासाठी कर्जात बुडालो, पण आज भीक मागण्याची वेळ; भाजप नेत्याची व्यथा सोशल मीडियावर व्हायरल