पंतप्रधान नरेंद्र मोदी लेहमध्ये दाखल; भारत – चीन मुद्द्यावर सैन्यांशी भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी सकाळी अचानक लेह राज्यात दाखल झाले. भारतीय सैन्याला भेट देण्यासाठी त्यांनी हा लेह दौऱ्या आयोजित केला. यावेळी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी निमू येथील सैन्य तळावर सैन्यांना मार्गदर्शन पर सुचना देत होते. लडाख सीमेवर सुरू असलेल्या भारत – चीन सैन्यामधील चकमकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही लेह भेट महत्त्वाची मानली जात आहे. याआधी फक्त चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपिन रावत यांचाच लेह दौरा पूर्वनियोजित होता. मे महिन्यापासून सीमेवर चीनसोबत तणाव सुरु असून परिस्थिती गंभीर आहे. त्यातच पंतप्रधान मोदीही त्यांच्यासोबत लेहमध्ये पोहोचल्याने सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का बसला.

आज केवळ सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह लेहला जाणार होते. परंतु गुरुवारी त्यांच्या कार्यक्रमात अचानक बदल करण्यात आला. तेव्हा फक्त बिपिन रावत लेहमध्ये जातील असे ठरले. मात्र आज बिपिन रावत यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदीही लेहमध्ये दाखल झाले.

हेही वाचा –

संतापजनक! महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेहावर केला बलात्कार