Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश किंग कोण? नरेंद्र मोदी की राहुल गांधी… भाजप आणि काँग्रेसमध्ये दावे- प्रतिदावे

किंग कोण? नरेंद्र मोदी की राहुल गांधी… भाजप आणि काँग्रेसमध्ये दावे- प्रतिदावे

Subscribe

भाजप म्हणतंय की मोदीचं किंग तर काँग्रेसनं राहुल गांधी यांना किंग म्हटलयं. अधिक लोकप्रिय कोण यावरून आता भाजप आणि काँग्रेसमध्ये दावे- प्रतिदावे पाहायला मिळत आहेत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे, भाजपचा दावा आहे की एनडीए पूर्ण बहुमताने हॅटट्रिक करेल आणि दुसरीकडे, विरोधी पक्ष हे INDIA नावानं युती करून सत्ताधारी मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी विचारमंथन करत आहेत. या सगळ्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये नवे युद्ध सुरू झाले आहे. यावेळी ही लढाई वेगळी आहे. कारण, सोशल मीडियावर दोन्ही पक्षांमध्ये त्यांच्या नेत्यांच्या म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेबाबत चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांचे स्वतःचे दावे आहेत, भाजप म्हणतंय की मोदीचं किंग तर काँग्रेसनं राहुल गांधी यांना किंग म्हटलयं. अधिक लोकप्रिय कोण यावरून आता भाजप आणि काँग्रेसमध्ये दावे- प्रतिदावे पाहायला मिळत आहेत. ( PM Narendra Modi Vs Rahul Gandhi who is popular on social media debate between congress and BJP NTC )

काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनाते यांनी शनिवारी एक डेटा जारी केला ज्यात दावा केला आहे की लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा राहुल गांधींना जास्त पसंत करतात. यासाठी राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणाच्या सोशल मीडिया एंगेजमेंटचा डेटा शेअर केला. त्यांनी म्हटलं की, एक गोष्ट स्पष्ट आहे, लोक पंतप्रधान मोदींच्या जुमल्यांना कंटाळले आहेत, ते प्रेमाविषयी बोलणाऱ्या लोकनेत्याला ऐकत आहेत.

- Advertisement -

काँग्रेसने राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटरचा तुलनात्मक डेटाही जारी करून सोशल मीडियावरील लढाईत नरेंद्र मोदी हेच पुढे असल्याचा दावा केला.

तर काँग्रेसने राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटरचा तुलनात्मक डेटाही जारी केला आहे. पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने दावा केला आहे की राहुल गांधींचं शेवटचे 30 ट्वीट 481.3 लाख लोकांनी पाहिलं आहे, तर पंतप्रधान मोदींच्या शेवटच्या 30 ट्वीटला 215.9 लाख इंप्रेशम मिळालं आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमनुसार ही आकडेवारी शनिवारी संध्याकाळपर्यंतची आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: अजित पवार-शरद पवार यांच्या भेटीबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले… )

काँग्रेसचा दावा फोल

सध्याचे देशाच्या प्रमुखांपैकी मोदी हे जगात सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते आहेत. ट्विटरवर त्यांचे 9.8 कोटी फॉलोअर्स आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यापेक्षा कितीतरी पटीने ते पुढे आहेत. बायडेन यांच्याकडे फक्त 3.7 कोटी फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्समध्ये कोणत्या भारतीय राजकारणी दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर उत्तर आहे अमित शहा, त्यानंतर अरविंद केजरीवाल, योगी आदित्यनाथ आहेत. त्यानंतर 2.4 कोटी फॉलोअर्ससह राहुल गांधी पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे खरं तर राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत खूप मागे आहेत.

- Advertisment -