घरदेश-विदेशअफगाणिस्तानआडून दहशतवाद नको

अफगाणिस्तानआडून दहशतवाद नको

Subscribe

पंतप्रधानांचा पाकला थेट इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्राच्या महासभेतून पाकिस्तानला थेट इशारा देत दहशतवादाच्या मुद्यावर खडसावले. दहशतवादाचा राजकीय टूलच्या स्वरूपात वापर करणार्‍या देशांना हे समजण्याची गरज आहे की दहशतवाद हा त्यांच्यासाठीही धोका आहे, असेही ते म्हणाले. पाकिस्तानचे नाव न घेता पंतप्रधानांनी दहशतवादाचा फटका हा पाकिस्तानलाही बसू शकतो असे सांगितले.

अफगाणिस्तानच्या जागेचा वापर हा दहशतवाद पसरवण्यासाठी न होणे गरजेचे आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानच्या नाजूक स्थितीचा वापर हा आपल्या स्वार्थासाठी टूलच्या स्वरूपात वापर करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्राच्या 76 व्या महासभेत बोलताना त्यांनी पाकिस्तानकडून अफगाणिस्तानचा दहशतवादासाठीचा होणारा वापर पाहता इशारा दिला.

- Advertisement -

अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला अफगाणिस्तानातील जनता, महिला आणि मुले तसेच अल्पसंख्यांक समुदायाची मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानची मदत ही आपलीही तितकीच जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. अफगाणिस्तानच्या संकटाने अनेक गोष्टी स्पष्ट केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अफगाणिस्तानची सध्याची परिस्थिती पाहता या भूमिचा वापर हा दहशतवादी कारवायांसाठी आणि दहशतवाद पसरवण्यासाठी होता कामा नये, असा इशारा त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता थेट दिला. त्यामुळेच पाकिस्तानातील सद्य परिस्थितीचा कोणीही दुरूपयोग करता कामा नये. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या भूमिचा वापर हा आपल्या स्वार्थासाठी करता कामा नये. सध्या अफगाणिस्तानातील जनता ही अडचणीत आहे, त्यामुळे त्यांना मदत करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण अफगाणिस्तानच्या नागरिकांना मदत करून आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -