PM Modi Address: निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर पीएम नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपने आपलं कमळ फुलंवलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने जोरदार बॅटींग केली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरूवार) दिल्लीतील मुख्यालयात दाखल होणार असून भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

भाजपच्या मुख्यालयात होणार सेलिब्रेशन

विधानसभा निवडणुकीच्या शानदार प्रदर्शनानंतर भाजपच्या मुख्यालयात सेलिब्रेशन केलं जाणार आहे. या कार्यक्रमात पीएम नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांचा समावेश असणार आहे. यूपीमध्ये निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून भाजपला सपाने मोठी टक्कर दिली. परंतु भाजपला चांगल्या प्रकारे बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत समाजवादी पक्षाने एमव्हाय फॅक्टरने पूर्णपणे नकार दिला आहे. भाजपला सहा फॅक्टरचा फायदा झाला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ४० हजार मतांनी आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री योगी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे. योगींना जनतेनं मोठ्या प्रमाणात मत दिली आहेत. एकूण आतापर्यंत योगींना ६५ हजार ८०२ मतं मिळाली आहेत. तर त्यांच्याविरोधात असलेल्या चंद्रशेखर आझाद यांना ३५१६ मत मिळाली आहे. तर समाजवादी पार्टीच्या शुभावती शुक्ला यांना २१ हजार ३७५ मत मिळाली आहे. परंतु योगी ४० हजार मतांनी आघाडीवर आहेत.

भाजपची चार राज्यात मुसंडी

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत सलग दुसऱ्या वेळी भाजपने मुसंडी मारली आहे. देशातील पाच राज्यांमध्ये फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मतदान झालं होतं. आज विधानसभेचे निकाल जाहीर झाले असून भाजप पुन्हा एकदा सत्तेत निवडून आली आहे.


हेही वाचा : UP Election Result 2022 : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा क्लीन स्विप, ४० हजार मतांनी विजयाच्या दिशेने वाटचाल