Corona Vaccine: लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात नरेंद्र मोदी कोरोना लस घेणार

pm narendra modi will take corona vaccine in second phase
Corona Vaccine: लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात नरेंद्र मोदी कोरोना लस घेणार

देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाच्या मोठ्या मोहीमेला सुरुवात झाली आहे. सध्या लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू आहे. या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईनवर्कर्सना लस दिली जात आहे. आता दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील कोरोना लस घेणार असल्याचे समोर आले आहे. तसेच मोदींसह सर्व राज्यातील मुख्यमंत्री कोरोना लस टोचून घेणार आहेत. सर्वसामान्यांमध्ये लसीबाबत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मोदी आणि इतर नेते लस घेणार आहेत.

लसीकरणाच्या सुरुवातील दिवसात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ‘लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील लोकांना लस दिली जाईल. या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी पण लस घेतील.’ माहितीनुसार, देशातील अनेक बडे नेते जसे की गृहमंत्री अमित शहा, इतर राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि मंत्रिमंडळातील सदस्या लस घेतली. तसेच ५० वर्षांवरील सर्व खासदार आणि आमदारांना देखील कोरोना लस दिली जाईल.

देशात सध्या पहिल्या टप्प्यातील लसीकरण सुरू आहे. पण असे असेल तरी सर्वसामान्यांमध्ये लसीबाबत एक भीतीचे वातावरण आहे. हीच भीत घालवण्यासाठी आणि लोकांमध्ये लसीबाबत आत्मविश्वास वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींसह इतर नेते लस टोचणार आहे.

दरम्यान देशात गेल्या २४ तासांत १५ हजार २२३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १५१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात १९ हजार ९६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ६ लाख १० हजार ८८३वर पोहोचली. यापैकी १ लाख ५२ हजार ८६९ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी २ लाख ६५ हजार ७०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या १ लाख ९२ हजार ३०८ जणांचावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ८ लाख ६ हजार ४८३ जण कोरोनाची लस दिली गेली आहे.


हेही वाचा – Corona Vaccine : भारत सहा देशांना पुरवणार कोरोना लसीचे डोस