काळ्या पैशांची माहिती देण्यास पीएमओने दिला नकार

देशात काळा पैसा कितपत आला? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. परंतु, पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओने) ही माहिती देण्यास नकार दिला आहे.

PMO refuses to give information on black money
काळ्या पैशांची माहिती देण्यास पीएमओने दिला नकार

२०१४ च्या निवडणुकीत सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाबाहेरील सर्व काळा पैसा आणणार असल्याचे आश्वासन दिले होते. आपण निवडून आलो तर हा काळा पैसा देशात आणून प्रत्येक नागरिकाच्या बॅंक खातेत १५ लाख रुपये टाकण्याचे आश्वासन मोदींनी केले आहे. त्यांच्या या आश्वासनावर लोकांनी विश्वास ठेवून त्यांना सत्तेत आले. त्यांना सत्ता मिळून चार वर्षे पालटून गेली. परंतु, अजूनही लोकांच्या खात्यात पैसे आले नाही. लोकांनी त्यांच्या पंधरा लाखांच्या आश्वासनाला राजकीय स्टंट माणले जरी असते तरी देशात काळा पैसा कितपत आला? हे जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु, पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओने) ही माहिती देण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा – स्वातंत्र्य लढ्यासाठी योगदान देणाऱ्याचे नाव सांगा; कमलनाथांचे मोदींना आव्हान

काय आहे नेमकं प्रकरण?

भारतीय वन सेवेतील अधिकारी चतुर्वेदी यांनी माहितीच्या अधिकारामार्फत सरकारकडून माहिती मागितली आहे. त्यांनी या माहिती अधिकारात सरकारने २०१४ पासून आतापर्यंत किती काळा पैसा भारतात आणला, अशी माहिती मागितली होती. १६ ऑक्टोबरला केंद्रिय माहिती आयोगाने हा प्रस्ताव दाखल करुन १५ दिवसांच्या आत विदेशातून भारतात आणलेल्या काळ्या पैशांची माहिती देण्याची मागणी केली होती. यावर पीएमओने ही माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. माहिती अधिकाऱ्याच्या कलम ८(१) नुसार एखादी माहिती जाहिर केल्यास तपास यंत्रणेत आणि दोषींविरोधात खटला जाहिर करण्यात अडथळा येत असेल तर अशी माहिती माहितीच्या अधिकारी दिली जाऊ शकत नाही. पीएमओने हेच कारण सांगत माहिती देण्यास नकार दिला आहे.


हेही वाचा – ३० वर्षांपूर्वी निधन झालेल्या माझ्या वडिलांना राजकारणात कशाला खेचता? – मोदी