Polar Bears : पहिल्यांदाच ध्रुवीय अस्वलानं केली रेनडियरची शिकार, Global Warming बाबत वैज्ञानिकांचा मोठा खुलासा

ध्रुवीय अस्वलं आपल्या सफेद रंगासाठी आणि विशालकाय आकारासाठी प्रसिद्ध आहेत. ही अस्वलं मुख्यत्वे बर्फाळ प्रदेशात आढळून येतात. परंतु सोशल मीडियावर ध्रुवीय अस्वलाबाबत एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये अस्वल एका रेनडियरची शिकार करताना दिसत आहे. व्हारयल झालेल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच ध्रुवीय अस्वलानं रेनडियरची शिकार केल्यामुळे वैज्ञानिक आणि पर्यावरण मित्रांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच वैज्ञानिकांनी Global Warming मोठा खुलासा केला आहे. The Weather Channel India ने ही व्हिडिओ शेअर करत चिंता व्यक्त केली आहे.

बर्फाळ प्रदेश आर्क्टिकमधील ध्रुवीय अस्वल हिवाळा संपल्यानंतर मासे खाऊन आपलं पोट भरतात. परंतु एका अस्वलाने रेनडियरची शिकार करत आपलं पोट भरलं आहे. परंतु मासे यांच्या व्यतिरिक्त अस्वलाने रेनडियरची शिकार केल्यामुळे वैज्ञानिकांना मोठा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ आर्क्टिक महासागरातील नॉर्वेजियन द्वीपसमूह स्वालबार्डबद्दल असल्याचं सांगितलं जात आहे. एक रेनडियर ध्रुवीय अस्वलाच्या शिकारातून वाचण्यासाठी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अस्वलाने त्याचा पाठलाग करत त्याची शिकार केली आहे.

अन्नाच्या शोधासाठी अस्वलांची भटकंती

सामान्य ऋतूमध्येही अन्नाच्या शोधासाठी अस्वल इकडे-तिकडे भटकत आहेत. परिणामी थंडीचे दिवस घालवण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी ऊर्जा उरलेली नाहीये. ग्लोबिल वॉर्मिंगमुळे मासे किंवा इतर पदार्थ खाणं त्यांच्यासाठी कठीण झालंय. त्यामुळे ते इतर प्राण्यांची शिकार करत असल्याचं वैज्ञानिकांचं मत आहे.

अशा परिस्थितीत ध्रुवीय अस्वलांना जगणं कठीण

ध्रुवीय अस्वलं समुद्रातील प्राण्यांची शिकार करण्यात पारंगत आहेत. परंतु थंडीच्या हंगामात समुद्र गोठत असल्यामुळे माशांची ते शिकार करू शकत नाहीत. त्यामुळे तो रेनडियरची शिकार करताना आढळून आला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे ऑर्क्टिक समुद्राचा बर्फ उन्हाळ्यात लवकर वितळतो आणि हिवाळ्यात उशीरा गोठतो. त्यामुळे अशा परिस्थितीत ध्रुवीय अस्वलांना जगणं कठीण होत असल्याचं दिसून आलंय. तसेच हे धक्कादायक असल्याचं देखील वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : Indian railway new rules : रात्रीच्या ट्रेन प्रवासासाठी रेल्वेचे नवे नियम जारी, अन्यथा होऊ शकते कारवाई