नवी दिल्ली : बेंगळुरु येथील अभियंता अतुल सुभाष याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस आता सक्रिय झाले आहेत. अतुल सुभाष याने त्याची पत्नी निकिता आणि सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याचा आरोप करत आत्महत्या केली होती. अतुल सुभाष आणि त्याती पत्नी निकिता सिंघानिया यांच्यामध्ये न्यायालयात सुनावणी सुरू होती. या सुनावणीदरम्यान, निकिताने अतुल सुभाषला अडवणार असल्याची धमकी दिली होती. तसेच 3 कोटी रुपये देऊन तोडगा काढ अन्यथा संपूर्ण कुटुंबाला अडकवणार असल्याचे निकिताने म्हटल्याचे अतुल सुभाषने सांगितले होते. याचपार्श्वभूमीवर बेंगळुरु पोलिसांनी अतुल सुभाष याची पत्नी निकिता सिंघानिया, तिची आई निशा आणि तिचा भाऊ अनुराग यांचा शोध सुरू केला आहे. या तिघांना अटक करण्यासाठी बेंगळुरु पोलिसांनी गुरुवारी जौनपूरला एक पथक पाठवले आहे. (Police are searching for Atul Subhash’s wife and her family members in connection with his suicide)
अतुल सुभाष याने आत्महत्या करण्यापूर्वी दीड तासाचा एक व्हिडीओ जारी केला होती. तसेच 24 पानांचे पत्रही लिहिले आहे. अतुल सुभाषने आरोप केला की, निकिता आणि तिचे कुटुंबीय संपूर्ण प्रकरण संपवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी करत होते. तसेच मुलाला भेटण्यासाठी 30 लाख रुपयांचीही मागणी केली होती. दरम्यान, अतुल सुभाष याच्या आत्महत्येनंतर त्याचा भाऊ विकास याने निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबीयांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र बेंगळुरु पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्याआधीच ते त्याचं जौनपूर येथील घर सोडून फरार झाले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या शोध घेण्यासाठी जौनपूर पोलिसांचीही मदत घेण्यात आली आहे.
हेही वाचा – Bomb Threat To RBI : आरबीआयची इमारत बॉम्बने उडविण्याची धमकी, रशियन मेलमुळे खळबळ
दरम्यान, निकिता सिंघानिया, तिची आई निशा आणि तिचा भाऊ अनुराग यांच्या शोधासाठी एक टीम पाठवली आहे, अशी बेंगळुरु पोलिसांनी दिली. तसेच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, निकिता, निशा आणि अनुराग यांना ताब्यात घ्यायचे की, त्यांना नोटीस बजावायची याचा निर्णय तपास अधिकारी घेणार आहेत. मात्र निकिता, निशा आणि अनुराग हे तिघे जौनपूर येथील घरातून पळून गेल्याचे वृत्त आहे. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जौनपूरचे एसपी अजयपाल शर्मा म्हणाले की, आम्हाला अद्याप बेंगळुरू पोलिसांकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यांच्या बाजूने मदत मागितली तर आम्ही नक्कीच पाठिंबा देऊ.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
दरम्यान, 10 डिसेंबर रोजी एका 34 वर्षीय एआय अभियंत्याने बेंगळुरुमध्ये आत्महत्या केली होती. त्याने 24 पानांची सुसाइड नोट सोडली होती. ज्यामध्ये त्याने त्यांची पत्नी आणि तिच्या कुटुंबावर छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच देखभाल भत्ता अधिक मिळविण्यासाठी चार वर्षाच्या मुलाचा वापर केल्याचेही त्याने म्हटले आहे. आत्महत्येपूर्वी अतुलने कारच्या चाव्या, पूर्ण झालेल्या आणि उर्वरित कामांची यादी कपाटात ठेवली होती. अतुलने त्याच्या खोलीत एक फलकही टांगला होता, ज्यावर ‘न्याय झालाच पाहिजे’ असे लिहिले होते.
हेही वाचा – Santosh Deshmukh Murder : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट; खासदार सोनवणेंच्या मागणीला यश