Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम PUBG खेळता खेळता झाले भांडण, १३ वर्षीय मुलाची डोक्यात दगड घालून हत्या

PUBG खेळता खेळता झाले भांडण, १३ वर्षीय मुलाची डोक्यात दगड घालून हत्या

Related Story

- Advertisement -

पबजी (PUBG) गेमच्या वेडापायी काही जणांनी आपला मौल्यवान जीव गमावला आहे. तर काहींना जेलची हवा खावी लागली आहे. असा काहीसा प्रकार कर्नाटकच्या मेंगलोर शहरात घडला आहे. पबजी खेळता खेळता दोन मुलांमध्ये भांडण झाले आणि इतके विकोपाला गेले की, त्यातला एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. हत्या केलेल्या मुलगा अवघ्या १३ वर्षांचा असून त्याच्या मृतदेह रविवारी सकाळी पोलिसांना सापडला. याप्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

हत्या झालेला मुलगा सतत पबजी खेळत होतो आणि तो नेहमी जिंकत होता. एका मोबाईल स्टोअरवर त्याची ओळख आरोपीसोबत झाली. त्यानंतर दोघांनी एकत्र पबजी खेळण्यास सुरुवात केली. पण यावेळेस आरोपी मुलगा सतत हरत होता. त्याला संशय आला की, समोरच्या मुलाच्या जागी दुसरेच कोणीतरी खेळत आहे. त्यामुळे आरोपीने एकत्र बसून खेळण्याचा निर्णय घेतला. शनिवारी रात्री दोघे पबजी खेळण्यासाठी एकत्र बसले. परंतु यावेळी पीडित मुलगा हरला. त्यानंतर दोघांमध्ये भांडणं सुरू झाली आणि पीडित मुलाने आरोपीवर दगडाने वार केला.

- Advertisement -

याच रागाच्या भरात आरोपीने मोठ्या दगडाने त्याच्यावर वार केला. जखमी झाल्यानंतर पीडित मुलाचे रक्त वाहू लागले आणि तो बेशुद्ध झाला. त्यामुळे आरोपी घाबरला आणि त्याच्या शरीरावर केळ्याच्या आणि नारळाच्या झाडाची पाने टाकून झाकले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

माहितीनुसार, उल्लाल पोलीस आरोपी अल्पवयीन मुलाची चौकशी केली जात आहे. या घटनेच्या वेळी दुसरी कोणती मुलं होती का? याबाबत चौकशी सुरू आहे. शहराचे पोलीस अधिकारी एन शशी कुमार घटनास्थळी तपास करण्यासाठी पोहोचले आहेत. ही दुर्दैवी घटना असून जर तुम्ही आपल्या मुलांना मोबाईल देत असाल तर त्यांच्या दैनंदिन व्यवहारावर नजर ठेवा, अशी विनंती पोलीस अधिकाऱ्याने केली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – नवऱ्यासमोरच भर रस्त्यात महिलेवर सामूहिक बलात्कार करत काढला व्हिडिओ!


 

- Advertisement -