घरदेश-विदेशअखेर 'त्या' आमदाराला अटक; EVM ची केलेली तोडफोड

अखेर ‘त्या’ आमदाराला अटक; EVM ची केलेली तोडफोड

Subscribe

आंध्र प्रदेशातील जनसेना पार्टीच्या विधानसभा उमेदवारीने चक्क ईव्हीएम मशिनची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. त्या आमदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

लोकसभा २०१९ च्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आज, गुरुवारी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. देशातील २० राज्यांमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडत असताना पूर्वोत्तर राज्यांसह आंध्रप्रदेश मध्येही लोकसभेसह विधानसभा निवडणुकांसाठी मतदान घेण्यात येत आहे. मात्र आंध्र प्रदेशातील जनसेना पार्टीच्या विधानसभा उमेदवारीने चक्क ईव्हीएम मशिनची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या आमदाराने हे ईव्हीएम जमिनीवर आदळली आहे. अखेर त्या आमदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

पोलीस बंदोबस्त वाढवला 

आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या २५ जागांसह विधानसभेच्या १७५ जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या आहेत. आंध्र प्रदेशमधील जनसेना पक्षाचे विधानसभा उमेदवार मधुसुदन गुप्ता यांनी चक्क मतदान केंद्रातील ईव्हीएम मशिनच जमिनीवर आदळली. अनंतापूर जिल्ह्यातील गुटी मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. मशिन सातत्याने बंद पडल्याच्या घटना घडत असल्याने ईव्हीएम मशिन बोगस असल्याचे सांगत रागारागात गुप्ता यांनी ईव्हीएम मशिन दोन हातांनी हातात घेऊन जोरदार जमिनीवर आपटली. त्यामुळे ईव्हीएम मशिन खराब झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ मधुसुदन गुप्ता यांना अटक केली आहे. मात्र, या घटनेनंतर मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -