घरदेश-विदेशतोतया IAS अधिकारी अटकेत

तोतया IAS अधिकारी अटकेत

Subscribe

उत्तरप्रदेशमध्ये तोतया IAS अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

तोतया IAS अधिकाऱ्याला उत्तरप्रदेशमधील गोजियाबाद पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस स्टेशनमध्ये फोन करून मी IAS अधिकारी आहे. त्यामुळे माझ्या नातेवाईकांची कामं लवकर करा अशी बतावणी हा तोतया IAS अधिकारी करत होता. मनी त्यागी वय वर्षे २० असं या  अटक केलेल्याचं नाव आहे. दरम्यान, IAS अधिकारी असल्याची बतावणी केली जात असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवण्यास सुरूवात केली. अखेर, हा तोतया आयएएस अधिकाऱ्याला पोलिसांनी नोएडामधून अटक केली आहे. अटक करण्यात आलेली व्यक्ती ही बीए पास आहे. तो एका खासगी कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करत आहे. दरम्यान, मी आत्तापर्यंत केवळ काही वेळाच आयएएस अधिकारी असल्याची बतावणी केली. काही लोकांची कामं अडून राहिली होती. त्यासाठी मी असं पाऊल उचलत असे. पण, मी कुणाकडूनही पैसे घेतले नाहीत असं मनी त्यागीनं सांगितलं आहे. दरम्यान, मनी त्यागीची रवानगी ही न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -