घरट्रेंडिंगकुत्र्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये दिली तक्रार, कारण ऐकून थक्क व्हाल!

कुत्र्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये दिली तक्रार, कारण ऐकून थक्क व्हाल!

Subscribe

या घटनेत चक्क एका कुत्र्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आलीय. हे वाचून सुरूवातीला तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण ही घटना खरी आहे.

राजकीय नेते अनेकदा आरोप-प्रत्यारोप करत असतात आणि परस्परांवर अब्रुनुकसानीचे दावेही ठोकत असतात. तसंच आपली कोणती वस्तू हरवली किंवा चोरी झाली तर आपण सर्वात आधी पोलिसांत तक्रार देतो. पण ही बातमी काहीशी वेगळी आहे. कारण या बातमीत एका मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडण्यात आलंय. या घटनेत चक्क एका कुत्र्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आलीय. हे वाचून सुरूवातीला तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण ही घटना खरी आहे.

ही अजब घटना आंध्रप्रदेशमध्ये घडलीय. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांचे पोस्टर फाडल्याबद्दल कुत्र्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. एक कुत्रा हा घराच्या भिंतीवर लावलेलं पोस्टर फाडताना या व्हिडीओमध्ये दिसतंय. आपल्या पुढच्या पायांच्या पंजांनी तो पोस्टर फाडचो आहे. हे पोस्टर मुख्यमंत्र्यांचं आहे.

- Advertisement -

सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पार्टीद्वारे सुरू असलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणाचा भाग म्हणून जगन्ना मां भविष्यथु (जगन अण्णा आमचे भविष्य) या नारा असलेले स्टिकर घरावर चिकटवले गेले. हे पोस्टर या कुत्र्याने फाडले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा: “२४ तासात पंचनाम्याचा आकडा येणार”, सांगत आदित्य ठाकरेंच्या दाव्याबाबत अब्दुल सत्तार म्हणाले…

दासरी उदयश्री नावाच्या महिलेने विजयवाडा इथल्या काही महिलांच्या गटासह ही तक्रार दिली आहे. ही महिला विरोधी पक्ष तेलुगु देसम पार्टीची (टीडीपी) कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातं आहे.

हे ही वाचा: आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं ‘हे’ उत्तर, वाचा सविस्तर…

स्थानिक माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, ज्यांच्या पक्षाने १५१ विधानसभा जागा जिंकल्या त्या जगन मोहन रेड्डी यांच्याबद्दल त्यांना खूप आदर आहे. अशा नेत्याचा अपमान करणाऱ्या कुत्र्याने राज्यातील सहा कोटी जनतेला दुखावलं आहे. आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्या कुत्र्याला आणि कुत्र्याच्या मागे असणाऱ्यांना अटक करण्याची आम्ही पोलिसांना विनंती केली आहे, असंही त्या म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -