घरदेश-विदेशगौरी लंकेश यांच्याप्रमाणे ३६ जण होते निशाण्यावर; 'त्या' डायरीत धक्कादायक नोंदी

गौरी लंकेश यांच्याप्रमाणे ३६ जण होते निशाण्यावर; ‘त्या’ डायरीत धक्कादायक नोंदी

Subscribe

गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांच्या हाती एक डायरी लागली आहे. या डायरीमध्ये गौरी लंकेश सारखे एकून ३६ लोकांवर लक्ष्य करण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती बाहेर आली आहे.

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी एकाची डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. डायरीचा अधिकांश भाग हा कोडिंगमध्ये आहे. या डायरीमध्ये गौरी लंकेशप्रमाणे ३६ लोकांची हत्या करण्याचा उल्लेख करण्यात आला असून या हत्येसाठी सुमारे ५० शूटर्सची निवड करण्यात आली आहे. डायरीमध्ये ज्या लोकांना लक्ष्य करण्यात येणार होते, त्यातील बहुतेक लोक महाराष्ट्रातील असून कर्नाटकातील १० लोकांचा देखील यात समावेश आहे.

डायरी कोणाची आहे?

गौरी लंकेश यांच्या हत्येतील संशयित आरोपी अमोल काळे याची डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. या डायरीत गौरी लंकेश प्रमाणे ३६ लोकांना लक्ष्य करण्यात येणार होते. या लोकांची हत्या करण्यासाठी निवड करण्यात आलेले तरुण कट्टर हिंदूत्ववादी आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांमधील हिंदू संघटनांद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या संमेलनांमध्ये सगळ्यात साहसी कोण? याची स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेतून काही तरुणांची निवड हत्येच्या कामांसाठी केली जाते. डायरीमध्ये नमूद केलेल्या ३६ लोकांच्या हत्येसाठी एकूण ५० शूटर्सची निवड करण्यात आली होती. या ५० शूटर्समधील काही लोकांना बेळगाव, हुबळी आणि पुण्यात शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले गेले होते.

- Advertisement -

लंकेश यांच्या हत्येसाठी वाघमारेचीच निवड का?

गौरी लंकेश यांच्या हत्येतील मुख्य आरोपी परशुराम वाघमारेवर गोळी चालविण्याचा आरोप आहे. २०१२ मध्ये वाघमारेने कर्नाटकाच्या विजयपुरा जिल्ह्यातील गृहनगरमध्ये सांप्रदायिक वाद वाढावा म्हणून पाकिस्तानचा झेंडा फडकविला होता. त्यामुळे त्याची निवड करण्यात आली होती. वाघमारेला या हत्येपूर्वी बस आणि जेवणाच्या सुविधेसाठी ३ हजार रुपये देण्यात आले होते. त्याचबरोबर हत्येनंतर १० हजार रुपये दिले गेले होते. या आरोपींनी गौरी लंकेश यांना मारण्यामागचे कारण त्या अॅन्टी-हिंदू असल्याचे सांगितले आहे. एसआयटीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या बंदुकीने लंकेश यांची हत्या केली गेली, त्याच बंदूकीने गोविंद पानसरे आणि प्रोफेसर कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -