दिल्ली : तीस हजारी कोर्टाबाहेर वकील, पोलिसांमध्ये धुमश्चक्री

अद्याप या वादामागील कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. या धुमश्चक्रीत पोलिसांचे एक वाहन सुद्धा जाळण्यात आले आहे.

827984-delhi-tis-hazari

राजधानी दिल्लीत आज तीस हजारी न्यायालयाच्या परिसरात पोलीस आणि वकिलांमध्ये वाद उफाळला. पोलीस कर्मचाऱ्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर भडकलेल्या वकिलांनी पोलिसांची वाहनं पेटवल्याची घडना घडली आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक वकील गंभीर जखमी झाला आहे. जखमी वकिलावर स्टेफन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान काही वकील आणि पोलिसांमध्ये वाहनांच्या पार्किंगमुळे वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारी आणि जाळपोळ मध्ये झाले, अशी माहिती मिळाली आहे. पण अद्याप या वादामागील कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. या धुमश्चक्रीत पोलिसांचे एक वाहन सुद्धा जाळण्यात आले आहे.

827984-delhi-tis-hazari

मारहाण आणि वाहनांची जाळपोळ

राजधानी दिल्लीत आज तीस हजारी न्यायालयाच्या परिसरात पोलीस आणि वकिलांमध्ये धुमश्चक्री उडाली. या घटनेत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक वकील गंभीर जखमी झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या वकिलांनी पोलिसांना मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी कोर्ट परिसरातील वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या वेळी माध्यम प्रतिनिधींनासुद्धा मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर न्यायालय परिसराच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अतिरिक्त पोलीस दलास पाचारण केले आहे.

tiz-hazari-1200