पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घरी पोलीस, अटकेची शक्यता

No Pakistan PM has completed 5-year term in 75 years, here's why

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या अटकेचे वॉरंट घेऊन पोलीस त्याच्या लाहोरमधील राहत्या घरी पोहचले आहेत. तोशखाना प्रकरणी अटक वॉरंट घेऊन इस्लामाबाद पोलीस आज इमरान खान यांच्या जमां पार्क स्थित घरी पोहचले आहेत. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत अतिरिक्त सत्र न्यायाधीश जफर इक्बाल यांनी इम्रान यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

इस्लामाबाद पोलीस इम्रान खान यांना अटक करण्यासाठी लाहोरमधील त्यांच्या घरी उपस्थित असल्याचे पाकिस्तानमधील जिओ न्यूजच्या बातमीतून समजते. सर्व कायदेशीरबाबी पूर्ण झाल्यानंतर इम्रान खान यांना अटक केली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.


पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाल्यास देशातील स्थिती आणखी खराब होईल, असे विधान पीटीआयचे ज्येष्ठ उपाध्यक्ष फवाद चौधरी केले आहे. इम्रान खान यांना अटक करण्याचे कोणतेही प्रयत्न पाकिस्तानमधील वातावरण आणखी ढवळून निघण्यास कारणीभूत ठरेल. त्यामुळे माझी पाकिस्तान विरोधी आणि अकार्यक्षम सरकारला विनंती आहे की, त्यांनी देशाला आणखी संकटात टाकू नये.

इम्रान खान यांना २८ फेब्रुवारी रोजी अनेक प्रकरणांअंतर्गत कोर्टासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. यातील काही प्रकरणांमध्ये इम्रान खान यांना दिलासा मिळाला, पण तोशखाना प्रकरणात त्यांच्यावर अटकेची टांगली तलवार आहे.

काय आहे तोषखाना प्रकरण?
1974 साली स्थापन झालेला तोषखाना विभाग उच्च पदावरील लोकांकडून मिळालेल्या मौल्यवान भेटवस्तू गोळा करतो आणि कॅबिनेट विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली या संस्थेचं काम चालतं. या तोषखानातील वस्तू विक्रीनंतरही  मिळालेली रक्कम इम्रान खान यांनी लपवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्यावर सुनावणी सुरू आहे.

हेही वाचा – आमच्या लोकशाहीवर…, राहुल गांधींचा परदेशातून पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल