घरताज्या घडामोडीमोलकरणीशी लग्न करायला नकार दिला म्हणून निर्दयी मुलाने केली कुटुंबाची हत्या!

मोलकरणीशी लग्न करायला नकार दिला म्हणून निर्दयी मुलाने केली कुटुंबाची हत्या!

Subscribe

मोलकरणीशी लग्न करायला विरोध केला म्हणून घरच्यांनी केली हत्या

गुरुवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील धुमनगंज भागात एकाच कुटुंबातील ४ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. सायंकाळी उशिरा या घटनेची उकल झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतीक संबंधांना विरोध केल्यामुळे घराच्या मुलाने आई, वडील, बहिण आणि पत्नीची हत्या केली. यासाठी त्याने आपल्या मित्राला ८ लाखांची सुपारी दिली होती आणि ७५ हजार अ‍ॅडव्हान्सही दिले होते.

सुरुवातीच्या चौकशीत अतीशने सांगितले की लॉकडाऊनमुळे त्याच्या घरातील दुकान बंद आहे. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास तो काही कामानिमित्त घराबाहेर पडला आणि ३.३० वाजता तो घरी परतला. घरी आल्यावर त्याने पाहिले की त्याचे वडील, आई, बहीण आणि पत्नीचा खून झालेला आहे. एसएसपी सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांनी सांगितले की आम्ही संशयीत म्हणून अतीशला ताब्यात घेतले. पण पोलीसी खाक्या दाखवल्यावर त्याने घडलेली सर्व घटना सांगितली. घरात असणाऱ्या मोलकरणीबरोबर आतीशने अनैतीक संबंध होते. घरातल्यांनी याला विरोध केल्यावर, घरातल्यांची हत्या करण्यासाठी त्याने त्याचा मित्र अनुजला सुपारी दिली. पोलिसांनी आतिश आणि त्याचा मित्र मनोजला अटक केली आहे या खुनात मजत करणाऱ्या आणखी दोन व्यक्तींच्या पोलीस शोधात आहेत.

- Advertisement -

काय म्हणाला अतीश

आतिशने सांगितले की, त्याचे त्यांच्या मोलकरणीशी प्रेमसंबंध होते. आई किरण केसरवानी, वडील तुलसीदास केसरवानी, बहीण निहारिका केसरवानी आणि पत्नी प्रियंका केसरवानी यांनी त्याच्या या अनैतिक संबंधाला विरोध केला. त्याचबरोबर त्याच्या बहिणीने काही दिवसांपूर्वी त्याचा आणि मोलकरणीचा फोटो फेसबुकवर व्हायरल केला होता. त्यामुळे अतीश नाराज होता म्हणून त्यांने मित्राबरोबर घरातल्यांना मारण्याचा कट रचला.


हे ही वाचा – याला म्हणतात सोशल डिस्टन्सिंग पाळणे…तुम्हाला आवडली का आयडीया?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -