घरदेश-विदेश10 जनपथ आणि काँग्रेस कार्यालयाबाहेर पोलीस तैनात, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची...

10 जनपथ आणि काँग्रेस कार्यालयाबाहेर पोलीस तैनात, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची भीती

Subscribe

ही माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी 10 जनपथवर आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाबाहेर पोलीस दल तैनात केलेत. याबाबत पोलिसांकडून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती देण्यात येत आहे

नवी दिल्ली : सोनिया गांधी यांचे निवासस्थान 10 जनपथ आणि काँग्रेस कार्यालयाबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने नवी दिल्ली पोलिसांना एक महत्त्वाची माहिती दिली आहे. काही आंदोलक काँग्रेस कार्यालय आणि सोनिया गांधी यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने जमू शकतात, असं त्यांनी सांगितलं आहे. खरे तर नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात यंग इंडियनचे कार्यालय सील करण्याच्या ईडीच्या कारवाईनंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत. ही माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी 10 जनपथवर आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाबाहेर पोलीस दल तैनात केलेत. याबाबत पोलिसांकडून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती देण्यात येत आहे.

पोलिसांच्या कारवाईवर काँग्रेसने आश्चर्य व्यक्त केले

दिल्ली पोलिसांनी काँग्रेस मुख्यालयाकडे जाणारा रस्ता बंद केला आहे, हे आश्चर्यकारक आहे, असा दावा काँग्रेसनं केला आहे. दुसरीकडे काँग्रेस मुख्यालयात आंदोलक जमा होऊ शकतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यामुळे कोणतीही अनुचित परिस्थिती उद्भवू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले की, “दिल्ली पोलिसांकडून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयाशी जोडलेला रस्ता बंद करणे ही आता सामान्य गोष्ट आहे. त्यांनी आता पुन्हा तेच केले आहे जे अनाकलनीय आहे. त्यांनी ’24 अकबर रोड’ येथील काँग्रेस मुख्यालयाबाहेर एक व्हिडीओदेखील शेअर केला, ज्यामध्ये अनेक पोलीस दिसत आहेत.

- Advertisement -

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे पाऊल उचलले – दिल्ली पोलीस

काँग्रेसच्या या दाव्यावर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला आमच्या विशेष शाखेकडून माहिती मिळाली की, आंदोलक काँग्रेस मुख्यालयात जमू शकतात. त्यामुळे खबरदारीचे पाऊल उचलण्यात आले आहे. आम्ही बॅरिकेड्स लावले आहेत आणि पोलीस तैनात केले आहेत, जेणेकरून कोणतीही अनुचित परिस्थिती उद्भवू नये. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने दिल्लीतील नॅशनल हेरॉल्ड कार्यालयातील यंग इंडियन कंपनीचा परिसर “तात्पुरता सील” केला होता. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले की, “सत्याचा आवाज पोलिसांच्या दबावाला घाबरणार नाही. गांधींचे अनुयायी या अंधाराविरोधात लढतील आणि जिंकतील. नॅशनल हेरॉल्डचे कार्यालय सील करणे, काँग्रेसचे मुख्यालय पोलिसांच्या निगराणीखाली आणून तुरुंगात टाकणे यातून हुकूमशहाची भीती आणि रोष दोन्ही दिसून येतो. पण तरीही महागाई आणि बेरोजगारीचे प्रश्न विचारले जातील.


हेही वाचाः ईडीकडून यंग इंडियाचे कार्यालय सील; आक्रमक काँग्रेसचं शुक्रवारी देशभरात आंदोलन

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -