Eco friendly bappa Competition
घर क्राइम आसामच्या लेडी सिंघम जुनमोनी राभा यांचा रस्ते अपघातात मृत्यू

आसामच्या लेडी सिंघम जुनमोनी राभा यांचा रस्ते अपघातात मृत्यू

Subscribe

मुंबई | आसाममध्ये लेडी सिंघम म्हणून ओळखले जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक जुनमोनी राभा (Junmoni Rabha) यांचे रस्ते अपघातात (Road Accident) मृत्यू झाला आहे. जुनमोनी राभा यांनी वर्षाच्या ३० वर्षी मृत्यू झाला. जुनमोनी राभा या नागाव जिल्ह्यात त्यांची कार एका कंटेनर ट्रकला धडकली. यात जुनमोनी या जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कालियाबोर उपविभागातील जाखलाबांध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरुभुगिया गावात त्यांचा अपघात झाला. जाखलबंधा पोलीस स्टेशनचे प्रभारी पवन कलिता यांनी घटनेसंदर्भात सांगितले की, जुनमोनी या मंगळवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे गस्ती पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर जुनमोनी जवळच्या रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

पोलिसांनी कंटेनर ट्रकला ताब्यात आले असून हा कंटेनर उत्तर प्रदेशातून येत होता. परंतु, या अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटेनेचा आढावा नागावच्या पोलीस अधीक्षक लीना डोळे यांनी घेतला आहे. जुनमोनी या आपल्या खासगी कारमध्ये प्रवास करत होते. त्यांच्यासोबत कोणतीही सुरक्षा रक्षक नव्हता. त्या साध्या वेशात वरच्या आसामच्या दिशेने एकट्या का जात होत्या. याबद्दल अद्यापही काही माहिती मिळू शकली नाही.

भ्रष्टाचाराच्या आरोपात अटक 

- Advertisement -

जुनमोनी हे मोरीकोलॉन्ग पोलीस चौकीच्या प्रभारी होत्या. तेव्हा गुन्हेगारांविरुद्ध कठोरपणे वागल्यामुळे जुनमोनी या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. त्याचबरोबर जुनमोनी या कथित आर्थिक अनियमिततेमुळेही वादाच्या सापडल्या होत्या. गेल्या वर्षी जून महिन्यात जुनमोनी त्यांच्या पूर्व प्रेमीसबोत कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होते.

२०२२ मध्ये भाजप आमदारासोबतचा वाद चव्हाट्यावर 

माजुली जिल्ह्यातील न्यायालयाने जुनमोनीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर जुनमोनीला सेवेतून देखील निलंबित करण्यात आले. पण, त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आणि त्या पुन्हा सेवेत रुजू झाल्या. जानेवारी २०२२ मध्ये जुनमोनीला आणखी एका वादात सापडल्या होत्या. जेव्हा बिहपुरिया मतदारसंघातील भाजप आमदार अमिया कुमार भुईया यांच्यासोबतचे तिचे टेलिफोनिक संभाषण लीक झाले होते.

 

- Advertisment -