घरट्रेंडिंगपोलीस स्टेशनमध्ये सपना चौधरीच्या गाण्यावर डान्स, व्हिडिओ व्हायरल!

पोलीस स्टेशनमध्ये सपना चौधरीच्या गाण्यावर डान्स, व्हिडिओ व्हायरल!

Subscribe

सोशल मीडियावर हा व्हीडिओ तुफान व्हायरल झाला. या व्हीडिओत त्या वेड्या माणासाकडून पोलिस स्टेशनमधील ऑफिसर सपना चौधरीच्या फेमस गाणं ‘तेरी आंखो का यो काजल’ या गाण्यावर  डान्स करून घेत होते.

सपना चौधरीचे फॅन देशभर पसरले आहेत. हे फॅन्स सपना चौधरीच्या गाण्यावर लगेच नाचायला तयार असतात. नुकताच उत्तर प्रदेशातील एक पोलीस स्टेशनचा व्हिडिओ समोर आला आहे. या पोलिस स्टेशनमध्ये एक वेडा माणूस सपना चौधरीच्या गाण्यावर डान्स करत होता. पोलीसांनी या माणसाला लॉकडाऊन तोडल्यामुळे पोलीस चौकीत आणलं होतं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चौकीच्या इंचार्जला सस्पेंड करण्यात आलं आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओत त्या वेड्या माणसाकडून पोलीस स्टेशनमधील ऑफिसर सपना चौधरीच्या फेमस गाणं ‘तेरी आंखो का यो काजल’ या गाण्यावर  डान्स करून घेत होते.

त्या इसमाकडून तो डान्स करून घेतला जात होता त्यावेळी पोलीस चौकीचे प्रभारी विश्वनाथ मिश्रा, महिला पोलीस संजना बरोबर अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. हे सगळेच या माणसाबरोबर सपनाच्या गाण्यावरील डान्सचा आनंद घेत होते. यावेळी त्याला कोणीही थांबवलं नाही. कोणीही विरोध केला नाही.

- Advertisement -

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच एसीपी सीटी रामनाथ सिंह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. लवकरच दोषींवर कारवाईही करण्यात येणार आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आला आहे.


हे ही वाचा – अजबच! आता बकरी आणि फळंही सापडली कोरोना पॉझिटिव्ह!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -