जम्मू- काश्मीरमध्ये 24 तासात दुसरा दहशतवादी हल्ला, पोलीस कर्मचारी जखमी

crpf police

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमधील बिजबेहारा पोलिस ठाण्याच्या परिसरात शक्रवारी दुपारी पोलीस आणि सीआरपीएफ टीमवर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबाारात एक कर्मचारी जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.

ट्विटमध्ये काय? –

काश्मीर पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांनी अनंतनागच्या बिजबेहारा भागात दहशतवाद्यांनी पोलिस/सीआरपीएफ यांच्या सयुक्त नाका पथकावर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. त्या कर्मचाऱ्याला  तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली आहे. दहशतवाद्याचा शोध सुरू आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

आठ तासातील दुसरा दहशतवादी हल्ला –

आठ तासांतील हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. याआधी, शुक्रवारी पहाटे बांदीपोरामध्ये बिहारमधील एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गेल्या 10 महिन्यांत दहशतवाद्यांनी बिहारमधील 7 जणांची गोळ्या झाडून हत्या केली आहे.