घरताज्या घडामोडीसात वर्षानंतर पाकिस्तानात पोलिओ संपुष्टात, तरीही WHO कडून आणखी तीन महिने प्रवासावर...

सात वर्षानंतर पाकिस्तानात पोलिओ संपुष्टात, तरीही WHO कडून आणखी तीन महिने प्रवासावर निर्बंध

Subscribe

जागतिक स्तरावर पोलिओचे अस्तित्वात असलेले पाकिस्तान आणि अफगाणीस्तान हे दोनच देश आहेत. त्यातही पाकिस्तानने गेल्या वर्षभरात पोलिओवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलंय. मात्र, तरीही अफगाणीस्तानातील निर्वासितांमुळे पोलिओचा धोका असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पाकिस्तानी नागरिकांच्या प्रवासावरील निर्बंधांत तीन महिन्यांनी वाढ केली आहे.

डब्ल्यूएचओच्या मते, अफगाणिस्तान हा वाईल्ड पोलिओ विषाणूचा मुख्य स्त्रोत आहे. हा विषाणू पाकिस्तानात आल्यास या देशाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सात वर्षानंतर पाकिस्तानात पोलिओ संपुष्टात आला असला तरीही WHO ने प्रवास निर्बंधांच्या कालावधीत वाढ केली आहे. Thirtieth Polio IHR आपत्कालीन समितीने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला धोकादायक देश मानले आहे. हे दोन्ही देश पोलिओचे पूर्णपणे निर्मूलन करण्यात अयशस्वी ठरले आहेत. विषाणूच्या जागतिक प्रसारासाठी ते कारणीभूत ठरू शकतात, असे समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे.

- Advertisement -

२०१७ मध्ये, पाकिस्तानात पोलिओचे केवळ आठ नवीन रुग्ण आढळले. म्हणजेच पोलिओचा विषाणू नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचला होता. मात्र, २०१८ मध्ये पोलिओची पुन्हा १२ नवीन प्रकरणे पुढे आली. तर २०१९ मध्ये नवीन संसर्गाची संख्या १४७ वर पोहोचली होती. २०२० मध्ये ८४ पोलिओची नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. सुदैवाने २०२१ या वर्षात आतापर्यंत एकच प्रकरण समोर आले आहे. मे २०१४ मध्ये पाकिस्तानमध्ये पोलिओ संबंधित प्रवासी निर्बंध लादण्यात आले होते.

पोलिओ हा विषाणूंमुळे होणारा एक तीव्र व संक्रामक आजार आहे. पोलिओचे विषाणू मेंदू व मेरुरज्जूतील चेतापेशींना हानी पोहोचवतात. भारतात २०११ सालापासून तीन वर्षांत पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नसून, मार्च २०१४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने भारत पोलिओमुक्त झाल्याचे जाहीर केले. मात्र, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नवजात बालकांना पोलिओ होऊ नये, यासाठी भारत सरकारतर्फे सामूहिक लसीकरणाचा ‘दो बुँद जिंदगी के’ हा पल्स पोलिओ कार्यक्रम देशाच्या कानाकोपऱ्यांत नियमितपणे राबवला जातो. प्रामुख्याने लहान बालके या रोगाला बळी पडतात. त्यांच्यात हा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या रोगाला शिशु-पक्षाघात किंवा बालपक्षाघात असंही म्हणतात.

- Advertisement -

हे ही वाचा – MLC election: आमच ठरल्यानुसार घडलंय ! अमल महाडिकांचा अर्ज मागे, सतेज पाटलांचा मार्ग मोकळा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -