घरAssembly Battle 2022Assembly Election results 2022 : निकालाआधीच कुठे फुलांची सजावट, कुठे लाडू तर...

Assembly Election results 2022 : निकालाआधीच कुठे फुलांची सजावट, कुठे लाडू तर कुठे जिलेबीची तयारी

Subscribe

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर अशा राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली असून, ट्रेंडमध्ये झपाट्याने बदल होतानाचे चित्र आहे. निकालामुळे युपी, पंजाबसह विविध राज्यांतील सुरक्षा व्यवस्था अधिक वाढवण्यात आली आहे. या निवडणुकांच्या निकालाआधीच मात्र अनेक राज्यांतील राजकीय कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. दिल्लीत आपने, तर पंजाबमध्येही विविध पक्षांनी जल्लोषाची तयारी सुरु केली आहे. मिठाई, फटाके आणि ढोल ताशांची तयारी विविध राज्यांमधील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

दिल्लीत आम आदमी पक्षाचे कार्यालय निकालाआधीच सजवण्यात आले आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या बाजूने सर्वाधिक जनतेचा कौल दिसून येत आहे. त्यामुळे दिल्लीपाठोपाठ आता पंजाबमध्येही आम आदमी पक्षाला सत्ता मिळण्याचे मार्ग मोकळे झाले आहे. काँग्रेसमध्ये अमरिंदर सिंग विरुद्ध नवज्योतसिंह सिद्धू यांच्यातील वादामुळे काँग्रेस गोत्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये निवडणुक निकालांआधीच आपला विजय निश्चित असल्याचे गृहित धरत सेलिब्रेशनची जंग्गी तयारी केली आहे. दिल्लीतील आम आदमी पक्षाचे कार्यालय रंगीबेरंगी फुग्यांनी तसेच फुलमाळांनी सजवण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान पंजाबमध्येही मिठाईच्या दुकानांमध्ये लाडू, जलेबीसह विविध खमंग मिठाई बनवण्याची तयारी काल रात्रीपासून सुरु झाली आहे. पंजाबमधील एका मिठाई दुकानदाराने खास पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी ‘2022 जीत के लड्डू’ नावाचा एक भला- मोठा लाडू तयार केला आहे. त्यामुळे पंजाबमधील हा लाडू अनेकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. ५ किलोचा हा एक लाडू आहे. विविध पक्षांकडून वेगवेगळ्या मिठाईच्या दुकानांवर ऑर्डर दिल्या आहेत. लुधियाना शहरातील सहा जागांवर उमेदवारांच्या समर्थकांनी ऑर्डर देण्यास सुरुवात केली आहे. कन्फेक्शनरी असोसिएशनचे अध्यक्ष आणि लव्हली स्वीट्सचे मालक नरिंदर पाल सिंग लवली यांनी पाच किलोचा हा महा लाडू तयार केला आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेशमध्येही निवडणुक निकालांची धूम पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच उत्तरप्रदेशच्या लखनऊमध्ये सकाळपासून अनेक ठिकाणी जलेबी बनवण्याचे काम सुरु झाले आहे. अनेक उमेदवारांनी विजय होणार हे गृहित धरून जलेबीची ऑर्डर दिली आहे.

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांनी आज सकाळी गुरुद्वारमध्ये जाऊन विजयासाठी प्रार्थना केली, मतमोजणी सुरु होण्यापूर्वी मान संगरूरमधील गुरुद्वार गुरूसागर मस्तुआना येथे पोहचले. याशिवाय पंजाबमध्ये भगवंत मान यांचा विजय निश्चित समजत जल्लोषाची तयारी सुरु झाली आहे. मान यांच्या घराभोवती तसेच परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवण्यात आले आहे. तर विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी जलेबी तयारी करण्याचे काम सुरु झाले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -