Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश 'द केरळ स्टोरी' चित्रपटावरून राजकारण; 'या' राज्यातील मुख्यमंत्र्यांकडून टॅक्स फ्रीची घोषणा

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून राजकारण; ‘या’ राज्यातील मुख्यमंत्र्यांकडून टॅक्स फ्रीची घोषणा

Subscribe

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या चित्रपटावर राज्यात बंदी आणली आहे. तर दुसरीकडे मध्य प्रदेश आणि त्यापाठोपाठ आता उत्तर प्रदेशात चित्रपट टॅक्स फ्री करण्याची घोषणा आलेली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करत दिली.

सुदिप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली विजयी घोडदौड करत आहे. पण या चित्रपटावरून आता राज्यात नव्या राजकारणाला सुरूवात झाली. या चित्रपटाची कथा ही जातीय दंगली पसरवू शकते, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या चित्रपटावर राज्यात बंदी आणली आहे. तर दुसरीकडे मात्र, मध्य प्रदेश आणि त्यापाठोपाठ आता उत्तर प्रदेशातही हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करत दिली. त्यामुळे आता या चित्रपटामुळे एका नव्या राजकारणाला सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Politics from the film ‘The Kerala Story’; Tax free announcement by CM)

हेही वाचा – ‘द केरळ स्टोरी’ने अवघ्या तीन दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

- Advertisement -

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशभरातून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटाने पहिल्या विकेंडला म्हणजेच रविवारी 35.25 कोटी रूपयांचा गल्ला जमवला. तर सोमवारी कामाचा दिवस असताना देखील या चित्रपटाने तब्बल 15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत या चित्रपटाने 46 कोटी रुपयांचा गल्ला जमावला असल्याची माहिती समोर आली आहे.

या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता सर्वात पहिल्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी हा प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी हा चित्रपट करमुक्त करण्याची घोषणा केली. तसेच त्यांनी हा चित्रपट पाहण्याचे देखील आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. त्यांच्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करत ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली आहे. “‘The Kerala Story’ उत्तर प्रदेश में टैक्स फ्री की जाएगी।” असे ट्वीट त्यांच्याकडून करण्यात आले आहे. तर येत्या 12 मे ला आदित्यनाथ हे त्यांच्या कॅबिनेटसोबत हा चित्रपट पाहायला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

तर “बंगालमध्ये चित्रपटावर बंदी आणणं अत्यंत दु:खद. सर्वांनी हा चित्रपट पहायला हवा. पश्चिम बंगालने असं राजकारण करू नये.” असे ट्वीट करत उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. तर मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलंय, ‘मी दिग्विजय सिंह आणि कमलनाथजी यांना द केरळ स्टोरी चित्रपटाची तिकिटं पाठवली आहेत. मात्र अद्याप त्यांनी हा चित्रपट पाहिला नाही आणि कदाचित पाहणारही नाहीत. त्यांचा दृष्टीकोन बदलावा यासाठी मी त्यांना तिकिटं पाठवली होती. पण त्यांना झाकीर हुसैनच शांतीदूत वाटतो आणि बाटला हाऊस एन्काऊंटरवरच यांच्या डोळ्यांतून अश्रू येतात.’ असे ट्वीट करत म्हंटले आहे.

महाराष्ट्र आणि केरळ राज्यात या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा हा चित्रपट करमुक्त म्हणजेच टॅक्स फ्री करण्याची मागणी करण्यात येत आहे. तर येत्या काही दिवसांत हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा पार करू शकतो, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून वर्तविण्यात आला आहे.

- Advertisment -