घरदेश-विदेशPolitics : इंडिया आघाडीला गळती; 'भारतरत्न'देऊन भाजपाने आणखी एक विकेट काढली?

Politics : इंडिया आघाडीला गळती; ‘भारतरत्न’देऊन भाजपाने आणखी एक विकेट काढली?

Subscribe

नवी दिल्ली : मृत्यू मान्य आहे, पण कधीही भाजपसोबत जाणार नाही, असे एक वर्षांपूर्वी म्हणणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी काही दिवसांपूर्वीच इंडिया आघाडीची साथ सोडत एनडीएमध्ये सामील झाले आणि पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री झाले. यानंतर आता इंडिया आघाडीला पुन्हा एकदा धक्का बसणार असल्याची शक्यता आहे. राष्ट्रीय लोक दल म्हणजेच आरएलडी पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी एनडीएमध्ये जाण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. (Politics Leakage of India Alliance BJP took another wicket by giving Bharat Ratna)

हेही वाचा – Ravindra Waikar & ED : अजूनही निष्ठा ‘मातोश्री’वरच… पण ईडीचा तुरुंगवास नको; रवींद्र वायकरांची व्यथा

- Advertisement -

मोदी सरकारने आज आरएलडी प्रमुख जयंत चौधरी यांचे आजोबा आणि माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली. सरकारच्या या घोषणेनंतर जयंत चौधरी खूप भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी पंतप्रधान मोदींचे मनापासून आभार मानले. यावेळी त्यांना भाजपाशी हातमिळवणी करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना जयंत चौधरी यांनी ‘आता कुठल्या तोंडाने मी नकार देऊ?’ असे सूचक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर जयंत चौधरी एनडीएमध्ये जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

माध्यमांशी संवाद साधताना जयंत चौधरी म्हणाले की, ‘आजचा दिवस देशासाठी मोठा आहे. मी भावनिक आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींचे आभार मानतो. पंतप्रधान मोदींना देशाची नाडी कळते. आज कामगार, शेतकरी, मजूर यांचा सन्मान केला जात आहे. इतर कोणत्याही सरकारमध्ये हे करण्याची क्षमता नव्हती. मला आज माझे वडील अजित सिंह यांची खूप आठवण येते.युतीत आम्हाला किती जागा मिळतील याकडे मी लक्ष देणार नाही, तुम्हीही (प्रसारमाध्यमं) या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. पण मी कुठल्या तोंडाने तो प्रस्ताव नाकारू? मी समाजमाध्यमांवरील माझी कुठलीही पोस्ट डिलीट करणार नाही. जशी राजकीय परिस्थिती असेल त्यानुसार मी माझं मत मांडत राहीन, असे सूचक वक्तव्य जयंत चौधरी यांनी केले.

- Advertisement -

हेही वाचा – U19 WC 2024 Final : भारताकडे वचपा काढण्याची संधी; 6 महिन्यांत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाशी भिडणार

दोन-तीन दिवसांत युतीची घोषणा होण्याची शक्यता

जयंत चौधरी आणि त्यांचा पक्ष आरएलडी ‘इंडिया’ आघाडीचा भाग असून ते सार्वत्रिक निवडणुका एकत्र लढणार असल्याचा दावा विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. मात्र, जयंत चौधरी यांनी याबाबत मौन बाळगले आहे. त्यांनी असेही म्हटले की, मी दोन्ही बाजूने दरवाजे उघडे ठेवले आहेत.  अशातच सूत्रांकडून माहिती मिळत आहेत की, भाजपा आणि आरएलडी यांच्यात युती निश्चित झाली आहे. आरएलडीला बागपत आणि बिजनौर या 2 जागा, तर राज्यसभेची एक जागा दिली जाणार आहे. विशेष म्हणजे जयंत चौधरी यांचा पक्ष आरएलडी आणि एनडीएमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत युती होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -