घरदेश-विदेशPolitics : अटकेतील पतींसाठी पत्नी मैदानात! कोणाला फायदा अन् कोणाचे नुकसान

Politics : अटकेतील पतींसाठी पत्नी मैदानात! कोणाला फायदा अन् कोणाचे नुकसान

Subscribe

नवी दिल्ली : देशातील बडे नेते या ना त्या कारणाने तुरुंगात गेल्यानंतर त्यांच्या पत्नीचे राजकीय मैदानात उतरणे, ही काही नवीन गोष्ट नाही. 2024च्या लोकसभा निवडणुकीत तीन राजकारण्यांच्या पत्नी, आपल्या पतीचा राजकीय वारसा वाचवण्यासाठी लढण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे, तुरुंगात असलेले हे तिन्ही नेते सत्ताधारी भाजपाच्या विरोधी छावणीतील आहेत.

हेही वाचा – Lok sabha : शाहू महाराजांना सन्मान मग उदयनराजेंचं काय? फडणवीसांचा मविआला सवाल

- Advertisement -

हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि धनंजय सिंह यांच्या पत्नी श्रीकला यांची नावे आघाडीवर आहे. तिघींच्याही पतींना वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीपर्यंत ते बाहेर येण्याची शक्यता फारच कमी आहे. अशा स्थितीत पतीची राजकीय धुरा वाचवण्यासाठी तिघीही फ्रंटफूटवर खेळू शकतात, असे मानले जात आहे.

हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन

जमीन घोटाळ्याच्या आरोपाखाली झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून ते रांची तुरुंगात आहेत. आता त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. अलीकडेच मुंबईत इंडिया या विरोधकांच्या आघाडीची सभा झाली, त्यात झारखंड मुक्ती मोर्चातर्फे कल्पना सोरेन यांनी संबोधित केले होता.

- Advertisement -

संथाल परगणामध्ये फिरून त्या लोकांचा पाठिंबा मिळवत आहे. कल्पना सोरेन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारीही पक्षात सुरू आहे. दुमका येथून पोटनिवडणूक लढवू शकतात, असे झामुमोच्या सूत्रांनी सांगितले. हेमंत सोरेन यांनी तुरुंगात जाण्यापूर्वी ही जागा सोडली होती. संथाल परगणामधील झामुमोच्या मतदारांना भावनिक आवाहन करणे, हा उद्देश कल्पना सोरेन यांना पुढे आणण्यामागचा आहे. कल्पना यांच्या प्रचाराचा मुद्दाही हेमंत सोरेन यांच्यावरील कारवाई हाच आहे.

हेही वाचा – Students Vs BJP : भाजपा नेत्याच्या भाषणासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना केले कुलूपबंद!

धनंजयसिंहची पत्नी श्रीकला रेड्डी

उत्तर प्रदेशातील जौनपूरचे माजी खासदार धनंजय सिंह सध्या तुरुंगात आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या काही दिवस आधी एका अपहरण प्रकरणात ते दोषी आढळले होते. त्यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावेळीही धनंजय जौनपूरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. मात्र, शिक्षेमुळे त्याची ही इच्छा धुळीस मिळाली.

आता त्यांची पत्नी श्रीकला रेड्डी जौनपूरमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. श्रीकला या जौनपूर जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षही आहेत. धनंजय सिंह यांच्याबद्दलच्या सहानुभूतीची मते मिळविण्यासाठी समाजवादी पार्टी श्रीकला रेड्डी यांना तिकीट देऊ शकते. तथापि, सपा आणि बसपाकडून तिकीट न मिळाल्यास श्रीकला रेड्डी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, असा अंदाज आहे.

हेही वाचा – Mahayuti : माझ्या विजयाची माझ्यासकट जनतेला 100 टक्के खात्री; अढळराव पाटलांचा दावा

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल

कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांना अटक करण्यात आल्याने आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. केजरीवाल दीर्घकाळ ईडीच्या ताब्यात राहिल्यास त्यांच्या पत्नी पक्षाचा प्रचार करू शकतात. मागच्या वेळीही सुनीता यांनी केजरीवाल यांच्या नवी दिल्ली मतदारसंघासाठी प्रचार केला होता.
अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या पथकाने अटक केल्यावर सुनीता यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांचा संदेश त्यांनी देशवासीयांना वाचून दाखवला. सुनीता यासुद्धा आयआरएस अधिकारी होत्या. मात्र, त्यांनी आता व्हीआरएस घेतली आहे.

पत्नींचे फ्रंटफूटवर असणे फायदेशीर –

  1. तुरुंगात असलेल्या पतीसाठी पत्नीने मैदानात उडी घेणे राजकीय दृष्टिकोनातून सर्वात सोयीचे मानले जाते. सहानुभूती मतदारांचा लाभ त्यांना मिळतो.
  2. बिहारमध्ये लालू यादव, यूपीमध्ये गायत्री प्रजापती आणि आझम खान यासारख्या अनेक कुटुंबांना त्यांच्या पत्नीने सूत्रे हाती घेतल्याचा लाभ मिळाला आहे.
  3. राजकीय क्षेत्रात पत्नींच्या प्रवेशाचा राजकारण्यांच्या राजकीय वारशावर फारसा परिणाम होत नाही.

हेही वाचा – Sharad Pawar : शेतकऱ्यांचं उत्पन्न अजूनही दुप्पट झालेलं नाही; शरद पवारांनी मोदी सरकारवर डागले टीकास्त्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -