भारतात जीवघेणं प्रदूषण, नऊ वर्षांनी आयुष्य होणार कमी

ईपीआयसी संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात प्रदूषणामुळे भारतीयांचे आयुष्यमान कमी होण्याच्या मार्गावर असल्याचे सूचित करण्यात आले आहे.

93 of indians exposed to high pm 2.5 levels reports

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये प्रदूषणरहीत झालेल्या भारतात आता पुन्हा प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याच वायू प्रदूषणामुळे सुमारे ४० टक्के भारतीयांचे आयुर्मान नऊ वर्षांनी कमी होण्याची शक्यता आहे. शिकागो येथील ईपीआयसी संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात प्रदूषणामुळे भारतीयांचे आयुष्यमान कमी होण्याच्या मार्गावर असल्याचे सूचित करण्यात आले आहे.

या अहवालानुसार नवी दिल्लीबरोबरच मध्य, पूर्व आणि उत्तर भारतातील ४८ कोटी नागरिक प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेले आहेत. त्याचबरोबर भारतात वायूप्रदूषण वाढल्याने हवेचा स्तरही खालावला आहे. यामुळे विविध भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आयुर्मानावर याचा दुष्परिणाम होणार आहे. यामुळे प्रदूषण कमी करण्यासंबंधी आवश्यक उपाययोजना करण्याचा ईपीआयसीचा उ्ददेश आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये दिल्लीकरांनी प्रदुषणरहीत मोकळा श्वास घेतला होता. पण आता त्याच दिल्लीत प्रदूषणाच्या स्तरात वाढ झाली आहे. त्यानंतर पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सुके तण जाळल्यामुळे प्रदुषण वाढल्याच या अहवालात सांगण्यात आले आहे.