घरCORONA UPDATEलॉकडाऊनमुळे देशातील ९० शहरांमधील प्रदूषण घटले

लॉकडाऊनमुळे देशातील ९० शहरांमधील प्रदूषण घटले

Subscribe

संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्याने जनजीवन जरी विस्कळीत झाले असले तरी यातही एक दिलासादायक महिती समोर आली आहे. लॉकडाऊनच्या या दिवसात देशातील ९० हून अधिक शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी घटल्याचा दावा पर्यावरणवाद्यांनी केला आहे.

लॉकडाऊनच्या या दिवसात लोकांनी रस्त्यावर उतरणं जवळ जवळ बंद केलं आहे. त्यामुळे दळणवळणही बंद आहे. ज्यामुळे सर्वाधिक प्रदूषण होते. ती वाहतुकही बंद आहे. यामुळे इंधनामुळे हवेत होणाऱ्या प्रदूषमही कमी झाले असून आकाश मोकळे झाले आहे. निसर्गात सकारात्मक बदल होताना दिसत आहे. प्रामुख्याने देशातील अशी शहर जिथे कायम गजबजाट असतो. वाहनांची सतत येजा असते ती रिकामी झाली ाहेत. यामुळे सरकारच्या सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फॉरकास्टिंग अँड रिसर्च (सफर)ने दिलेल्या अहवालानुसार कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये म्हणून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे प्रदूषण दरमाही ३० टक्क्यांनी घटले आहे. तर अहमदाबाद आणि पुण्यात १५ टक्के प्रदूषण कमी झाले आहे. हवेतील नायट्रोजन ऑक्साईड प्रदूषणाची पातळी जी श्वसनसंदर्भात समस्या निर्माण करू शकते त्यातही घट झाली आहे. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणात पुण्यात ४३ टक्क्यांनी घट झाली आहे. मुंबईत ३८ टक्के , आणि अहमदाबादमध्ये ५० टक्क्यांनी घट झाली आहे. अशा ९० हून अधिक शहरात दिलासादायक चित्र असल्याचे सफरने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -