घरदेश-विदेशPoonam Pandey : मॉडेल पूनम पांडे बनू शकते सर्व्हायकल कॅन्सर मोहिमेचा चेहरा?

Poonam Pandey : मॉडेल पूनम पांडे बनू शकते सर्व्हायकल कॅन्सर मोहिमेचा चेहरा?

Subscribe

काहीच दिवसापूर्वी अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या पूनम पांडे हिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्याच निधनाची पोस्ट शेअर केली आणि सर्वत्र खळबळ उडाली होती. तिच्या पोस्टमध्ये सर्व्हायकल कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं.

नवी दिल्ली : आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि स्टंट करण्यासाठी प्रसिद्धी असलेल्या अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्यावर सरकार मोठी जबाबदारी सोपविण्याची शक्यता आहे. (Poonam Pandey Could model Poonam Pandey become the face of cervical cancer campaign)

काहीच दिवसापूर्वी अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या पूनम पांडे हिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्याच निधनाची पोस्ट शेअर केली आणि सर्वत्र खळबळ उडाली होती. तिच्या पोस्टमध्ये सर्व्हायकल कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. पूनम पांडेच्या निधनाच्या बातमीमुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. पण दुसऱ्याच दिवशी ही बातमी खोटी असल्याचं समोर आलं. सर्व्हायकल कॅन्सरविषयी जनजागृती करण्यासाठी पूनम पांडेने हा सर्व स्टंट केला होता.

- Advertisement -

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, अभिनेत्री पूनम पांडेचा सर्व्हायकल कॅन्सरविषयी सरकारच्या राष्ट्रीय जनजागृती मोहिमेचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून विचार केला जात नाही. गेल्या 2 फेब्रुवारी पूनम पांडेचा या आजाराने मृत्यू झाल्याची खोटी बातमी व्हायरल झाली होती. जेव्हा सत्य बाहेर आले तेव्हा लोकांनी अभिनेत्रीच्या या स्टंटवर जोरदार टीका केली.

हेही वाचा : Sharad Pawar : शरद पवारांची एस काँग्रेस ते राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार पक्षापर्यंतची वाटचाल

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

अलीकडेच अभिनेत्री पूनम पांडेच्या अधिकृत इंन्स्टाग्रामवरुन तिच्या टीमने सर्व्हायकल कॅन्सरने पूनमचा मृत्यू झाल्याची पोस्ट करण्यात आली होती. या बातमीच्या अखेर 24 तासांनंतर पूनमने स्वत: तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करत “मी जिवंत आहे” अशी बातमी दिली. व्हिडिओच्या सुरुवातीला पूनमने माफी मागितली, पूनम म्हणाली, सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी हे केलं. “हजारो महिलांचा सर्व्हायकल कॅन्सरने मृत्यू होतो. कारण त्यांना माहिती नसतं की काय करायचं पण हा कॅन्सर बरा होऊ शकतो फक्त तुम्हाला काही टेस्ट करुन HPV व्हॅक्सिन घ्यायची असते. सर्व्हायकल कॅन्सरमुळे आपल्याला प्राण गमवावे लागू नये म्हणून आपल्याला हे करायला हवं. असेही ती म्हणाली होती.

हेही वाचा : Mahad Fire : महाड एमआयडीसीमध्ये रासायनिक कारखान्याला भीषण आग; जीवितहानी टळली!

लसीकरणाला चालना मिळेल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अंतरिम अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले होते की, सर्व्हायकल कॅन्सर रोखण्यासाठी सरकार नऊ ते 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या लसीकरणास प्रोत्साहन देईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या महिन्यात सांगितले होते की, देशातील सर्व्हायकल कॅन्सरच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. याबाबत राज्ये आणि विविध आरोग्य विभागांशी नियमित बोलणी सुरू असल्याची माहिती देण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -