घरताज्या घडामोडीअरे बापरे! भारतात आढळला करोनाचा पहिला रुग्ण

अरे बापरे! भारतात आढळला करोनाचा पहिला रुग्ण

Subscribe

सध्या चीनमध्ये धुमाकूळ घालणारा करोना व्हायरस आता भारतात पोहोचला आहे.

सध्या चीनमध्ये धुमाकूळ घालणारा करोना व्हायरस आता भारतात पोहोचला आहे. केरळमध्ये हा रुग्ण आढळला असून हा तरुण चीनमधील हुआन विद्यापीठात शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाची भारतात परतल्यानंतर तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळला आहे. सध्या त्या तरुणाला रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले असून सध्या तरुणाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

जगभरातील १७० जणांना गमवावा लागला जीव

- Advertisement -

चीनमध्ये करोना व्हायरसचा मागील काही दिवसांपासून संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हायरस सार्स विषाणू इतकाच धोकादायक असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. चीनमधील नॅशनल हेल्थ कमिशनच्या अहवालानुसार करोनाचे ६८८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर या विषाणूमुळे जगभरातील १७० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर हुबेई प्रांतात मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असून आतापर्यंत चीनमधील एकूण मृतांपैकी ५२ जण हुबेई प्रांतातील आहेत. तर २ जण सेंट्रल हेनन प्रांतातील असून एकजण हेलगजिंग आणि एक हुबेई उत्तर प्रांतातील आहे. तर शांघाईमध्येही एका व्यक्तीचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

चीनहून आलेला Corona virus खरंच खतरनाक?

- Advertisement -

मुंबईत ४ संशयित रुग्ण

करोना व्हायरसची लक्षणे असलेले चार संशयित मुंबईत आढळून आले आहेत. या रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पुण्यातही दोन संशयित आढळून आले आहेत. त्यांच्यावर नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काय आहे करोनाव्हायरस | डॉक्टरांकडून जाणून घेऊयात याची कारणे, लक्षणे, उपचार, प्रतिबंधात्मक उपाय

करोना व्हायरसची लक्षणे काय आहेत

  • सर्दी, खोकला
  • तीव्र ताप
  • श्वास घ्यायला त्रास होणे, श्वासास अडथळा
  • न्यूमोनिया, अतिसार, फुप्फुसात सूज
  • करोना व्हायरसमुळे सर्दी, खोकल्याची लक्षणे दिसून येतात. पण, जर गंभीर प्रकारचा त्रास होत असेल तर मृत्यू देखील ओढवू शकतो.
  • सामान्य सर्दीसारखी याची लक्षणे नाहीत, ज्यामुळे चिंता अधिक बळावू शकतो.

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी खास उपाय

  • सर्दी किंवा फ्लूसारखी लक्षणे असलेल्या लोकांशी जवळचा संपर्क साधणे टाळा.
  • हात स्वच्छ करण्यासाठी साबण किंवा हॅंड वॉश कायम जवळ ठेवा.
  • मांस आणि अंडी योग्य प्रकारे शिजवून घ्या.
  • खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रूमाल ठेवा.

    हेही वाचा – महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण नाहीत -आरोग्यमंत्री टोपे


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -