Monday, June 21, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Positive India : 'एक्सरे सेतू' सांगतय फुफ्फुसांतील कोरोना संसर्गाची माहिती

Positive India : ‘एक्सरे सेतू’ सांगतय फुफ्फुसांतील कोरोना संसर्गाची माहिती

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाविरुद्ध लढाई लढण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत आहेत. अनेक नव नवीन वैज्ञानिक प्रयोग, शोध घेत कोरोनावर यशस्वीरित्या मात कशी करता याचा अभ्यास केला जात आहे. आत्तापर्यंत भारतात कोरोनावरील उपचारांसाठी केंद्र सरकारने अनेक आरोग्यविषयक चाचण्या, औषधांना मान्यता दिली. परंतु अनेकदा कोरोना संसर्गाची तीव्रता समजेपर्यंत उशीर होत असल्याने वेळीच योग्य उपचार करताना अडचणी निर्माण होत आहे. यामुळे कोरोना संसर्ग कमी वेळात फुफ्फुसांपर्यंत पोहचतोयं. परंतु यावर मार्ग काढत आता केंद्र सरकारने आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म एक्सरे सेतू’ ही यशस्वी यंत्रणा राबवली आहे. ‘एक्सरे सेतू’ च्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णाच्या फुफ्फुसांतील कोरोना संसर्गाची माहिती अगदी कमी वेळात मिळणार आहे.

ग्रामीण भागांत सध्य़ा कोरोना संसर्ग अधिक प्रमाणात पसरत आहे. यामुळे कोरोना चाचण्या करण्यासही वेळ लागत आहे. यात अनेकदा नव नव्या व्हेरियंटमुळे कोरोनाची लागण झाली असतानाही आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येतेयं. यावेळी रुग्णास ‘एक्सरे सेतू’ मदतीला येत आहे.

काय आहे नेमकं ‘एक्सरे सेतू’ ?

- Advertisement -

‘एक्सरे सेतू’ हा खास कोरोनाबाधितांसाठी तयार केलेली एक ऑनलाईन यंत्रणा आहे. ज्यामाध्यमातून रुग्ण कोरोना संसर्ग आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहचला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्या छातीचा एक्सरे डॉक्टरांना एक्सरे सेतूवर व्हॉट्सअ‍ॅप करु शकतात. याच पूर्ण प्रक्रियेला ‘एक्सरे सेतू’ असे नाव देण्यात आले आहे. या माध्यमातून रुग्ण कमी रेजोल्यूशनचे फोटो मोबाईलच्या माध्यमातून पाठवू शकतात. यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांवर त्वरीत उपचार करणे शक्य होणार आहे. भारतीय विज्ञान संस्थान, आणि बंगळुरुमधील नॉन फॉर प्रॉफिट फाउंडेशन आर्टपार्क विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने एक्सरे सेतू व्यवस्था तयार करण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यामातून कमी रिझोल्यूशचे छातीचा एक्स-रे पाठवित कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या फुफ्फुसांना कोरोना संसर्ग झाला आहे. की नाही ते समजून घेण्यासाठी एक्सरे सेतू मदत करत आहे.

रुग्णांचे आरोग्य तपासण्यासाठी कोणत्याही डॉक्टरांना फक्त www.xraysetu.com वर जाऊन ट्राई-दी फ्री एक्स-रे सेतु बीटा बटणावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर या प्लॅटफॉर्मलवरून ते सरळ दुसऱ्या पेजवर जातील. ज्यातून डॉक्टर वेब किंवा स्मार्टफोनच्या आधारे व्हॉट्सअॅपवर आधारित चॅट-बॉटशी जोडले जातील. याशिवाय एक्स-रे सेतू सेवा सुरू करण्यासाठी रुग्ण +91 8046163838 वर व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवू शकतात. डॉक्टरांना फक्त एक्स-रेच्या फोटोवर करावे लागेल आणि काही मिनिटांतच संबंधित एक्स-रे फोटोची माहिती पॉप अप होईल. कोरोनाचा फुफ्फुसांवर ठराविक ठिकाणी होणारा परिणाम लक्षात घेता या अॅपमध्ये डॉक्टरांच्या सोयीसाठी हीट-मॅपचाही समावेश केला आहे.

- Advertisement -

इंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने या प्रक्रियेच्या माध्यामातून आत्तापर्यंत १,२५,००० हून अधिक एक्स-रे तपासले आहेत. या प्रक्रियेमुळे रुग्णांवर त्वरीत उपचार करणे शक्य झाले असून यातील डेटाची संवेदनशीलता ९८.८६ टक्के आणि अचूकता ७४.७४ टक्के झाली आहे.

फुफ्फुसांच्या इतर आजारांची देखील समजतेय माहिती

एक्स-रे सेतू अॅपवर छातीचे एक्स-रे रिपोर्टची डॉक्टरांकडून लगेच माहिती करु घेणे शक्य होत आहे. कारण यातून एक्स-रे चे रिपोर्ट आपोआपच स्पष्ट करु सांगितले जात आहेत. तसेच भविष्यात रुग्णाला फुफ्फुसांचा त्रास होणार आहे की नाही याचीही माहिती दिली जातेय.कोरोनाशिवाय टीबी, न्यूमोनिया इत्यादीसारख्या फुफ्फुसांसंबंधित १४ विविध आजारांची माहिती घेणे शक्य होत आहे.


 

- Advertisement -