घरताज्या घडामोडीweather update : दिल्ली, पंजाब आणि हरियाणासह अनेक राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता,...

weather update : दिल्ली, पंजाब आणि हरियाणासह अनेक राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता, गारपीटच्या पावसाचा हवामानाकडून अंदाज

Subscribe

देशातील अनेक राज्यात उष्णतेच्या लाटांच्या झळा मोठ्या प्रमाणात बसत आहेत. ज्याप्रमाणे मे महिना जवळ येत आहे. त्याचप्रमाणे सूर्याचा गोळा हा मोठ्या प्रमाणात तापत आहे. १९ एप्रिलपर्यंत पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि मध्य प्रदेश यांसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या झळा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पश्चिम भागातील काही राज्यांमध्ये हवेची स्थिती सध्या सामान्य स्वरूपात आहे. मात्र, मुसळधार पावसासह गारपीटच्या पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतील काही भागांत हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानुसार, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यात देखील उष्णता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. झारखंड मध्ये १८ ते २० एप्रिल पर्यंत अशा प्रकारची स्थिती राहणार आहे. तर पुढील पाच दिवसांमध्ये पंजाबच्या विविध भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दिल्लीत भीषण गर्मिमुळे नागरिकांचे प्रचंड हाल

राजधानी दिल्लीमध्ये कालपासून गर्मीने अक्षरश: थैमान घातलं आहे. यापेक्षा अधि तापमान ४०.९ डिग्री अंश सेल्सिअस दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे १९ एप्रिलपर्यंत पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि मध्य प्रदेश यांसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या झळा वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

शनिवार आणि रविवारी दिल्लीतील हवामान बदलण्याची शक्यता आहे. शनिवारी किमान तापमान २२ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. याशिवाय रविवारी कमाल तापमानात किंचित बदल होऊन कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं.


हेही वाचा : अजानाला रोखलं तर महिला मंदिरांसमोर कुराण वाचतील; समाजवादी पार्टीच्या इशाऱ्याने वातावरण तापणार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -