बिअर होणार महाग, बिअर उत्पादक कंपन्यांचे दरवाढीचे संकेत

Beer companies signal increase in beer prices
बिअर होणार महाग, बिअर उत्पादक कंपन्यांचे दरवाढीचे संकेत

बिअरच्या दरात वाढ करण्या येणार असल्याचे बिअर उत्पादक कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे. बिअर बनवण्यासाठीच्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने ही दरवाढ करण्यात येणार असल्याने कंपन्याकडून सांगण्यात आले आहे. बिअर बनविण्यासाठी कच्चा माल, बार्ली, ग्लास, पॅकेजिंग यांच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे बिअरच्या दरात वाढ करण्यात येणार असल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे.

कच्च्या मालाच्या किमतीत वाढ –

एका रिपोर्टनुसार गेल्या तीन महिन्यांमध्ये बार्लीच्या दरात दुपट वाढ झाली आहे. लेबल, कार्टन आणि बॉटल क्राऊनमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे उत्पादन दरत वाढ झाल्याने बिअर कंपन्यांकडून दरात वाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ग्लास बनवणाऱ्या कंपन्यांनी गेल्या तीन महिन्यांमध्ये काचेच्या बाटल्यांच्या किमतीत वाढ केली आहे.

या राज्यात होणार बिअरच्या दरात वाढ –

DeVANS मॉडर्न ब्रूअरीजचे एमडी प्रेम दीवान यांनी सांगितले, कदाचित या निर्णयाचा रिटेल रेटवर लगेच परिणाम होणार नाही. मात्र, स्वस्त ब्रॅंडच्या बिअरच्या पुरवठ्यावर याचा जास्त परिणाम होऊ शकतो. युनाइटेड ब्रूअरीज आणि बी९ बीवरेज देखील आपल्या ब्रॅंडच्या किमतींमध्ये वाढ करु शकतात. या कंपन्या क्राफ्ट बिअर बीरा ९१ आदी बीअरची निर्मिती करत असतात. रिपोर्टनुसार, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि इतर लहान राज्यांमध्ये बिअरच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

देशात अल्कोहोलच्या किमती राज्य सरकारे ठरवतात. त्यामुळे दरात वाढ अथवा घट करण्यासाठी कंपन्या राज्य सरकारशी सल्लामसलत करत असतात. राज्य सरकारांना सर्वांधिक शेअर अल्कोहोलच्या दरातून टॅक्सच्या स्वरुपात मिळतो. बिअरच्या किमती वाढत असल्या तरी गेल्या दोन वर्षात बिअरच्या मागणीत वाढ झाली आहे.