Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश मोदी-ठाकरेंमध्ये वैयक्तिक भेट होणार? दिल्लीत घडामोडींना वेग

मोदी-ठाकरेंमध्ये वैयक्तिक भेट होणार? दिल्लीत घडामोडींना वेग

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज त्यांच्या शिष्टमंडळासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेत आहेत. या अधिकृत भेटीनंतर मुख्यमंत्री पंतप्रधान मोदी यांची वैयक्तिक भेट घेणार असल्याचं कळतंय. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

राज्यात मराठा आरक्षण प्रश्नावरून वातावरण तापलं. त्यामुळे मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री पंतप्रधान मोदी यांच्या भेटीआठी दिल्लीत पोहोचले आहेत. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांना वैयक्तिकरित्या १० मिनिटांसाठी पंतप्रधान मोदींना भेटायचं आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात बरेच वर्ष युती होती. मंत्री २०१९ मध्ये वाद होऊन शिवसेना युतीतून बाहेर पडली. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केलं. जरी शिवसेना युतीतून बाहेर पडली असली. तरी देखील शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले आहेत. लहान भाऊ आणि मोठा भाऊ असं समीकरण त्यांच्यात आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत काय चर्चा होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.

- Advertisement -

दरम्यान, नांदेडचे खासदार हेमंत पाटील हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत आहेत. ‘मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची स्वतंत्र भेट होईल का याबद्दल मला कल्पना नाही. तशी माहिती माझ्याजवळ नाही. मुख्यमंत्री मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी दिल्लीत आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात मराठा आरक्षणाबद्दल चर्चा होईल,’ असं पाटील यांनी सांगितलं.

 

- Advertisement -