घरदेश-विदेशpost office Scheme : जमा करा फक्त 95 रु आणि मिळवा 14...

post office Scheme : जमा करा फक्त 95 रु आणि मिळवा 14 लाखांचा फायदा,वाचा सविस्तर

Subscribe

20 वर्षांनी 2.8 लाख रुपये सुद्धा देण्यात येणार तसेच सर्व रक्कम जोडली असता 20 वर्षात ग्राहकाला 19.72 लाख रुपयांचा लाभ होतो

जगभरातील प्रत्येक व्यक्ती त्याच्या भविष्यात येणाऱ्या अडी-अडचंणीवर मात करण्यासाठी किंवा एखाद्या महत्वाच्या गोष्टीवर खर्च करण्यासाठी पैसे साठवून ठेवत असतो. जर तुम्ही सुद्धा लहान सहान गुंतवणुकीच्या आधारावर मोठी रक्कम साठवू इच्छित असाल तर पोस्ट ऑफिस (post office) तुम्हांला एक खास संधी देत आहे. या स्किममध्ये दररोज 95 रुपये भरुन 14 लाखपर्यंतचा नफा कमवू शकता. पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी नेहमी वेगवेगळ्या ऑफर घेऊन येते. या ऑफरमध्ये ग्राहकांना कमी वेळात जास्त फायदा करुन देण्याची योजना तयार करण्यात येते. पोस्ट ऑफिस स्किम ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन बीमा (Gram Sumangal Rural Postal Life Insurance) असे या योजनेचे नाव आहे. तसेच हि योजना अशा गरजू व्यक्तींसाठी आहे ज्यांना वेळोवेळी पैशांची गरज भासते.

काय आहे पोस्ट ऑफिसची स्किम?

ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन बीमा योजना हि पोस्ट ऑफिसचा एक (endowment plan) देणगी योजना आहे. या योजने अंतर्गत तुम्ही भरलेली रक्कम रिटर्न मिळण्यासोबतच योजना (maturie) मॅच्युअर झाल्यानंतर पैसे देण्यात येतात. या स्किमची सुरूवात भारत सरकारने 1995 मध्ये केली होती. या स्किम अंतर्गतच ग्राम सुमंगल स्किम तयार करण्यात आली आहे. तसेच आणखी पाच स्किम या योजनेत समाविष्ठ आहेत. सुमंगल योजना 15 ते 20 वर्षांपर्यंत असते. तसेच या योजनेमध्ये मॅच्युरिटीच्या आधी 3 वेळेस मनी बॅक दिला जातो. 10 लाख रुपयांची सुलभ रक्कम यामध्ये देण्यात येते. जर एखाद्या व्यक्तीचे आकस्मित निधन झाले तर पॉलिसी होल्डरला उर्वरित रक्कम सोबतच त्याला बोनस देखिल देला जातो.

- Advertisement -

कोण घेऊ शकतो या योजनेचा लाभ ?

– या योजनेचा लाभ भारतीय नागरिक घेऊ शकतो
– या योजनेसाठी व्यक्तीचे वय 19 ते 20 वर्षापर्यंत असायला हवं
-या स्किममध्ये 20 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो.

कसे व कधी मिळणार 14 लाख रुपये?

असे गृहित धरा की 25 वर्षाचा व्यक्ती 7 वर्षापर्यंत सम एश्योर्ड सोबत पॉलिसी खरेदि करत आहे.तर त्याचे वार्षिक प्रीमियम 32,735 रुपये येणार. साहा महिन्यात प्रीमियम 16,715 रुपये आणि तिमाही प्रीमियम 8449 रुपये इतके येणार. या प्रकार त्या व्यक्तीला दर महिन्याला 2853 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच जवळ-जवळ 95 रुपये दर दिवसाला प्रीमियम द्यावं लागेल आणि हि पॉलिसी 20 वर्षासाठी असणार आहे. 20 वर्षे पुर्ण झाल्यानंतर तुम्हाला 8 व्या, 12,16 व्या वर्षी 20-20 टक्यांच्या हिशोबाने 1.4-1.4 लाख रुपये मनी बॅक देण्यात येणार .
बोनस बद्दल सांगायचे झाल्यास या स्किमध्ये प्रत्येक वर्षी 48 हजार रुपये बोनस दिला जातो. सात लाख रुपये सम एश्योर्ड का बोनस एका वर्षात 33,600 रुपये झालेत. 20 वर्षांनी हि रक्कम 6.72 लाख रुपये होते. 20 वर्षांनी 2.8 लाख रुपये सुद्धा देण्यात येणार तसेच सर्व रक्कम जोडली असता 20 वर्षात ग्राहकाला 19.72 लाख रुपयांचा लाभ होतो.

- Advertisement -

हे हि वाचा – IPPB Account: घर बसल्या उघडा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खातं, जाणून घ्या प्रक्रिया

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -