घरताज्या घडामोडीPower crisis: Kabul अंधारात! अफगाणिस्तानात शेजारील देशांकडून खरेदी केली जातेय वीज

Power crisis: Kabul अंधारात! अफगाणिस्तानात शेजारील देशांकडून खरेदी केली जातेय वीज

Subscribe

अफगाणिस्तानमध्ये वीजचे संकट गहिरे झाले आहे. तालिबानचे सरकार आल्यामुळे अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये जवळपास ८० टक्के वीज शेजारील देश किंवा मध्य आशियाई पुरवठादारांकडून पुरवली जात आहे. यामध्ये उजबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांचा समावेश आहे. याशिवाय देशात नाघलू धरणावरील असलेला जलविद्युत प्रकल्प देशातील सर्वात मोठा वीज प्रकल्प आहे. येथून जवळपास १०० मेगाव्हॅट विजेचे उत्पादन होते ज्यामुळे देशातील सुमारे १ लाख घरांमध्ये प्रकाश पडतो. पण सध्या अफगाणिस्तानमधील सुमारे ६०-७० टक्के लोकसंख्या अंधारात आपले आयुष्य काढत आहे.

बुधवारी काबूलसह इतर प्रातांमध्ये वीज पुरवठा बाधित झाल्यामुळे अंधारात लोकांना राहावे लागले होते. अफगाणिस्तानमध्ये स्टेट पॉवर कंपनी डा अफगाणिस्तान ब्रेश्ना शेरकट (डीएबीएस) द्वारे जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, वीज गेल्याचे मोठे कारण उजबेकिस्तानातून येणाऱ्या विजेमध्ये काही तांत्रिक गडबड होती. ही तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी सध्या काम सुरू आहे. स्पुटनिकने म्हटले आहे की, जेव्हापासून तालिबान सरकार देशात आले आहे तेव्हापासून सेंट्रल एशियन इलेक्ट्रिसिटी पुरवठाची थकबाकी भरली नाही आहे. पैशांची समस्या असल्यामुळे ही थकबाकी अफगाणिस्तान भरू शकत नाही आहे.

- Advertisement -

डीएबीएएसचे अॅक्टिंग हेड सफिउल्लाह अहमदजई म्हणाले की, जेव्हा थकबाकी पूर्ण केली जाईल तेव्हा देशातील विजेचा पुरवठा पुन्हा सुरू होईल. तालिबान सरकार आल्यापासून अफगाणिस्तानचे वीजचे बोर्ड त्यांच्या स्वाधीन झाले आहे. सध्या शेजारीला देशातून येणाऱ्या विजेसाठी अफगाणिस्तानला जवळपास ६२ मिलियन डॉलर थकबाकी द्यावी लागले.


हेही वाचा – Happiest cities in the world: ही आहेत भारतातील सर्वात आनंदी शहर , मुंबई मात्र सर्वात निराशाजनक


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -