घरताज्या घडामोडीPPF : दररोज 100 रुपयाची बचत 15 वर्षानी मिळवून देणार 10 लाखांचा...

PPF : दररोज 100 रुपयाची बचत 15 वर्षानी मिळवून देणार 10 लाखांचा परतावा

Subscribe

पब्लिक प्रोव्हिडेंट फंड म्हणजेच पीपीएफ हे बचत खाते गुंतवणूकीचा उत्‍तम पर्याय म्हटले जाते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजना ही एक दीर्घकालीन गुंतवणूकीचा पर्याय आहे जी आकर्षक व्याज दर आणि गुंतवणूकीच्या रक्कमेवर परतावा देते.नोकरी करता करता सध्याच्या घडीला गुंतवणुकीचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही अशाप्रकारचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

पब्लिक प्रोव्हिडेंट फंड म्हणजेच पीपीएफ हे बचत खाते गुंतवणूकीचा उत्‍तम पर्याय म्हटले जाते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजना ही एक दीर्घकालीन गुंतवणूकीचा पर्याय आहे जी आकर्षक व्याज दर आणि गुंतवणूकीच्या रक्कमेवर परतावा देते.नोकरी करता करता सध्याच्या घडीला गुंतवणुकीचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही अशाप्रकारचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अनेक जण आजही सरकारी योजनांमध्ये डोळ बंद करुन गुंतवणूक करणे पसंत करतात. कारण सरकारी योजनेत गुंतवणूक केली तर पैसे सुरक्षित राहतात याशिवाय चांगला रिर्टनही चांगला मिळतो. ज्यात दररोज 100 रुपयाची बचत होणार आणि 15 वर्षानी 10 लाखांचा परतावा मिळवून देणार

जर तुम्ही या स्कीममध्ये दररोज 100 रुपयांची सेव्हिंग करत असाल तर, एका महिन्यात तुम्ही त्यात 3 हजार रुपये टाकू शकाल. त्यानुसार, तुमची गुंतवणूक वार्षिक 36 हजार रुपये होते. ग्रोच्या पीपीएफ कॅल्क्युलेटरनुसार, दररोज 100 रुपयांची बचत केल्यास 15 वर्षांनंतर मॅच्युरिटीवर तुम्हाला 9 लाख 76 हजार 370 रुपये मिळतील. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 5, लाख 40 हजार रुपये असेल आणि त्यावर 4 लाख 36 हजार 370 रुपये व्याज मिळेल.

- Advertisement -

तुम्ही हे आणखी 5 वर्षे चालू ठेवल्यास ही योजना गुंतवणुकीच्या दुप्पट परतावा देईल. 20 वर्षानुसार तुमची गुंतवणूक 7, लाख 20 हजार रुपये असेल. यावर तुम्हाला 8 लाख 77 हजार 989 रुपये व्याज मिळतील. अशा प्रकारे, दररोज 100 रुपयांची बचत करून, तुम्ही 20 वर्षांत 15 लाख 97 हजार 989 रुपयांचा निधी जमा करु शकता.

सरकारकडून सुरक्षेची हमी

पीपीएफशी संबंधित सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारकडून सुरक्षेची हमी असते. PPF खाते 15 वर्षांत परिपक्व होते, परंतु ते पुढे वाढवले ​​जाऊ शकते. यातील दुसरी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे परतावा चक्रवाढ व्याजाच्या आधारावर दिला जातो. म्हणजेच, तुम्ही जितका जास्त वेळ द्याल तितक्या वेगाने तुमचे पैसे वाढतील. या योजनेत तुम्ही एका वर्षात किमान 500 रुपये, तर जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवू शकता.

- Advertisement -

हेही वाचा – ऐकावं ते नवलच! ‘या’ वृद्धाने 67 वर्षांपासून अंघोळच केली नाही; कारण वाचून थक्क व्हाल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -