घरअर्थजगतPPF Account मधून पूर्ण पैसे काढायचे आहेत? फॉलो करा 'हे' नियम

PPF Account मधून पूर्ण पैसे काढायचे आहेत? फॉलो करा ‘हे’ नियम

Subscribe

जर तुम्ही तुमच्या मुलाचेही पीपीएफ अकाउंट एक पालक म्हणून ओपन करु शकता.

भविष्य सुरक्षित आणि आनंदात जगण्यासाठी आज अनेकांना कुठेतरी पैसै गुंतवणे आवडत आहे. यासाठी बाजारातही गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यातीलच सर्वसामान्यांच्य विश्वासार्ह पर्याय म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF). पीपीएफमध्ये केलेल्या गुंतवणूकीतून तुम्हाला केवळ सुरक्षित भविष्याची हमीच मिळत नाही तर टॅक्समधूनही सूट मिळते. यात मॅच्युरिटी पिरियटनंतर तुम्हाला उत्तम रिटर्नसही मिळते. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा सार्वजनिक बँकांमध्ये पीपीएफ अकाउंट ओपन करु शकता. तुम्ही तुमच्या मुलाचेही पीपीएफ अकाउंट एक पालक म्हणून ओपन करु शकता.

पीपीएफ खात्यात केवळ भविष्यातील बचतच करु शकत नाही तर त्यावर तुम्ही कर्जही घेऊ शकता. परंतु PPF खात्यावर कर्ज घेण्यासाठी सरकारने काही अटी व शर्ती लागू केल्या आहेत. तुमच्या पीपीएफ अकाउंटला ५ वर्षे पूर्ण झाल्यास त्यावर तुम्ही कर्जही घेऊ शकता. त्यामुळे ज्या आर्थिक वर्षात तुम्ही पीपीएफ अकाउंट सुरु केले तेव्हापासून पाच वर्षे पूर्ण झालेली असावीत. परंतु 3 वर्षांनी जर तुम्हाला जमा केलेली रक्कम काढायची झाल्यास यातील केवळ 75 टक्के रक्कम काढता येते. मात्र पाच वर्षांपेक्षा कमी वेळात तुम्हाला कर्ज घेता येत नाही.

- Advertisement -

PPF Account मधून असे काढा पूर्ण पैसे

पीपीएफ खाते मॅच्युर होण्यासाठी साधारणपणे 15 वर्षे लागतात. त्यानंतर तुम्ही जमा केलेले सर्व पैसे काढू शकता. पण, तुम्हाला माहिती आहे का की, हे पैसे तुम्हाला आधीही काढता येतात? होय, तुम्ही पीपीएफ खात्यातून मुदतपूर्तीपूर्वीच पैसे काढू शकता.

१) यात अत्यंत धोकादायक आजार किंवा आश्रित व्यक्तीचा आजार झाल्यास तुम्ही पैसे काढू शकता.

- Advertisement -

२) मुलांच्या उच्च शिक्षणासाठीही हे पैसे काढता येतात.

३) जर तुम्ही परदेशात शिफ्ट होणार असाल तरीही तुम्हाला PPF Account मधून पूर्ण पैसे Withdraw करता येतात.


Amruta Fadnavis Vs Vidya Chavan : विद्या चव्हाण वि अमृता फडणवीस वादात देवेंद्र फडणवीसांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -