घरताज्या घडामोडीPradhan Mantri Kisan Maandhan Yojna: शेतकऱ्यांनो महिन्याला अवघे ५५ रूपये गुंतवा, वर्षाला...

Pradhan Mantri Kisan Maandhan Yojna: शेतकऱ्यांनो महिन्याला अवघे ५५ रूपये गुंतवा, वर्षाला मिळतील ३६००० रुपये

Subscribe

ज्यांचे वय १८ ते ४० वर्ष आहे असे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ

देशात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या गेल्या आहेत. किसान सन्मान निधी ही त्यातील एक योजना आहे. योजनेमार्फत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळतात. त्याच बरोबर सरकारची आखणी एक योजना आहे ज्याचे नाव आहे, प्रधानमंत्री किसान मानधन योजना (Pradhan Mantri Kisan Maandhan Yojna) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ३६००० रुपये मिळू शकतत. मात्र त्यासाठी दर महिन्याला केवळ ५५ रुपये भरावे लागणार आहेत. या योजनेला पीएम किसान पेंशन योजना (PM Kisan Pension Scheme) म्हणूनही ओळखण्यात येते. केंद्र सरकारने मोदी सरकारद्वारे देशातील छोट्या आणि सीमांत प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून ही योजना सुरु करण्यात आली. ३१ मे २०१९ पासून ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना दर महिना ३ हजार रुपये पेंशन म्हणजेच वर्षांला ३६००० रुपये पेंशन दिली जाणार आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? या योजनेसाठी कोणती कागदपत्र असणे आवश्यक आहे? योजनेचा लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे? जाणून घ्या.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना दर महिना ५५ रुपये भरावे लागतील ५५ रुपयांप्रमाणे वर्षाला एकूण ६६० रुपये शेतकऱ्याला जमा करावे लागतील. त्यानंतर शेतकऱ्याचे वय ६० वर्ष झाल्यानंतर त्याला योजनेतून दरमहिना ३६००० रुपये पेंशन स्वरुपात मिळेल. २५ वर्षात शेतकरी किती पैसे जमा करत आहे याची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना देण्यात येईल. जर लाभार्थी शेतकऱ्याचे निधन झाले तर त्यांचे पैसे सुरक्षित राहतील. लाभार्थी शेतकऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या पत्नीला ५० टक्के रक्कम मिळत राहिल.

- Advertisement -

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

देशातील छोट्या गावात आणि सीमांत भागात राहणारे शेतकरी ज्यांचे वय १८ ते ४० वर्षांमध्ये आहे असे शेतकरी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांकडे २ हेक्टर किंवा त्यापेक्षाही कमी शेत जमिन आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड, ओळखपत्र, वयाचा दाखला,आयकार्ड, बँक बुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साइज फोटो,शेतीची कागदपत्रे, कोणाच्या नावे किती जमिन आहे याची माहिती असलेली कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

- Advertisement -

योजनेचा लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस काय?

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी कॉमन सर्विस सेंटरवर जाऊन रजिस्ट्रेशन करणे महत्त्वाचे आहे.

  • प्रथम maandhan.in या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • वेबसाइटवर केल्यानंतर तिथे Login पर्यायवर क्लिक करा. त्यानंतर Click Here Apply now या पर्यायावर क्लिक करा.
  • Login केल्यानंतर तुम्हाला नाव, पत्ता,मोबाईल क्रमांक,केप्चा कोड इत्याही माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर रजिस्ट्रर केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. OTP टाकल्यानंतर योजनेचा फॉर्म तुमच्या समोर येईल.
  • फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती भरावी. त्यानंतर Submit या पर्यायावर क्लिक करा.
  • फॉर्म Submit झाल्यानंतर फॉर्मची एक फोटो कॉपी काढून आपल्या जवळ ठेवा. पुढील कोणत्याची कामासाठी योजनेच्या फॉर्मची फोटो कॉपी वापरता येईल.

हेही वाचा – Petrol Diesel Price : सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या तुमच्या शहारातील दर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -