घरदेश-विदेशमोदी सरकार 'या' महिलांच्या खात्यात पाठवतंय ५ हजार रुपये; जाणून घ्या सविस्तर

मोदी सरकार ‘या’ महिलांच्या खात्यात पाठवतंय ५ हजार रुपये; जाणून घ्या सविस्तर

Subscribe

कोरोना महामारीदरम्यान सामान्य माणसांवर आर्थिक संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत, प्रथमच गर्भवती महिलांच्या कल्याणासाठी जानेवारी २०१७ मध्ये सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान मातृ वंदना योजना (Pradhan Mantri Matru Vandana Yojana- PMMVY ) त्यांच्यासाठी वरदान ठरत असल्याचे सिद्ध होत आहे. आत्तापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेंतर्गत नोंदणी केली असून त्या लाभ घेत आहेत. केंद्र सरकार गर्भवती महिलांच्या खात्यात ५ हजार रुपये देत आहे. तुम्हालाही या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर या योजनेबद्दल वाचा सविस्तर…

जाणून घ्या PMMVY योजनेबद्दल ?

केंद्र सरकार देशभरातील महिला आणि नवजात मुलांच्या भवितव्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. गर्भवती महिला आणि नवजात मुलांचा विकास लक्षात घेता केंद्र सरकारने PMMVY ही योजना तयार केली आहे. या योजनेंतर्गत गर्भवती महिला व स्तनपान देणाऱ्या महिलांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. हे ५ हजार रूपये तीन हप्त्यांमध्ये देण्यात येत आहे. १९ वर्षांपेक्षा आधी गर्भवती असलेल्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही, अटी या योजनेची अट आहे.

- Advertisement -

जाणून घ्या, कधी कधी मिळणार पैसे?

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत पहिल्यांदा गर्भवतींना आहारासाठी ५ हजार रुपये खात्यात दिले जातात. याचा पहिला हफ्ता १ हजार रूपयांचा असून गर्भधारणेच्या १५० दिवसांच्या आत दिला जातो, तर दुसरी हप्ता २ हजार रूपयांचा असून १८० दिवसांच्या आत आणि तिसरा हप्ता २ हजार रुपयांचा दिला जातो तो डिलिव्हरीनंतर आणि जेव्हा बाळाचे प्रथम लसीकरण पूर्ण झाल्यानंतर दिला जातो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

मातृत्व वंदना योजना २०२१ अंतर्गत केंद्र सरकारने अर्ज प्रक्रिया ऑनलाइन केली आहे, याचा अर्थ लाभार्थी स्वत: ऑनलाईन अर्ज करू शकतात. यासाठी प्रथम लाभार्थ्यास www.Pmmvy-cas.nic.in वर लॉग इन करून अर्ज करता येणार आहे.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -