Homeदेश-विदेशPrashant Kishor Arrested : राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांना अटक, नेमके कारण...

Prashant Kishor Arrested : राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांना अटक, नेमके कारण काय?

Subscribe

गांधी मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले जन सुराजचे संस्थापक, राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांना सोमवारी (ता. 06 जानेवारी) अटक करण्यात आली आहे. बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात पहाटेत मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या.

पाटणा : गांधी मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले जन सुराजचे संस्थापक, राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांना सोमवारी (ता. 06 जानेवारी) अटक करण्यात आली आहे. बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात पहाटेत मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. प्रशांत किशोर हे 02 जानेवारीपासून बीपीएससीच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. परंतु, आज सकाळी बिहार पोलिसांनी त्यांचे हे उपोषण मोडित काढत त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले आणि त्यांना एम्स रुग्णालयात तपासाकरिता घेऊन गेल्यची बातमी समोर आली आहे. (Prashant Kishor Arrested by Patna Police during Bihar BPSC Protest)

पाटण्यातील गांधी मैदानात प्रशांत किशोर आमरण उपोषणाला बसले होते. याचवेळी पहाटे 04 वाजण्याच्या सुमारास प्रशांत किशोर आणि इतर लोकांना पोलीस जबरदस्तीने उचलून नेले. यावेळी झालेल्या झटापटीत एका पोलिसाने प्रशांत किशोर यांच्या कानशिलात लगावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ज्यावेळी प्रशांत किशोर यांना नेण्यासाठी पोलीस आले, त्यावेळी त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी पोलिसांचा विरोध केला. परंतु, पोलिसांनी बळाचा वापर करत सर्व विद्यार्थ्यांना बाजूला केले, ज्यानंतर त्यांनी प्रशांत किशोर यांना ताब्यात घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जयच्या घोषणाही दिल्या.

हेही वाचा… HPMV : चीनमधील HPMV विषाणुमुळे महाराष्ट्र आरोग्य विभाग अलर्ट मोडवर, मार्गदर्शक सूचना जारी

पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी प्रशांत किशोर बीपीएससी अनियमिततांसंदर्भात म्हणाले की, ते 7 जानेवारीला उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. त्यांनी राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांनाही विरोध करण्याच आवाहन केले आहे. “तेजस्वी यादव एक मोठे नेते आहेत. ते विरोधी पक्षाचे नेते आहेत. विरोधी पक्ष या नात्याने माझ्याजागी त्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करायला पाहिजे होते. त्यांनी या विरोध प्रदर्शनाचे नेतृत्व करावे” असे आवाहन प्रशांत किशोर यांनी यावेळी केले. तर, राजकारण कधीही करता येऊ शकते. पण इथे आमच्या पक्षाचा कोणताही बॅनर नाहीये, असे प्रशांत किशोर यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. पहाटे पोलिसांनी प्रशांत किशोर यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना एम्समध्ये नेण्यात आले. परंतु, या ठिकाणी त्यांनी कोणतेही उपचार करण्यास स्पष्टपणे नकार दिला.