घरताज्या घडामोडीPrashant Kishor : प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता, २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी करणार...

Prashant Kishor : प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता, २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी करणार तयारी

Subscribe

रणनितीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला रणनितीकार प्रशांत किशोर यांनी हजेरी लावल्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले होते. प्रशांत किशोर यांनी बैठकीमध्ये २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही सूचना काँग्रेस नेत्यांना दिल्या आहेत. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीव आघाडीबाबतही त्यांनी मत व्यक्त केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला काही सूचना दिल्या आहेत. काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये प्रशांत किशोर यांनी कमकुवत असलेल्या राज्यांमध्ये आघाडी करण्यावर भर देण्याची सूचना दिली आहे. तर किशोर यांनी बिहारमधील राष्ट्रीय जनता दलासोबतच्या युतीच्या विरोधात मत व्यक्त केले. राजदसोबत युती केल्यामुळे यादवांशिवाय काँग्रेसला मत मिळत नाही असे प्रशांत किशोर म्हणाले आहेत.

- Advertisement -

भाजपला मिळणारे यश हे धार्मिक ध्रुवीकरणामुळे मिळत असल्याचा तर्क प्रशांत किशोर यांनी खोडून काढला आहे. भाजपला जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणामुळे यश मिळत नसल्याचे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं आहे. या मताशी राहुल गांधी यांनीसुद्धा सहमती दर्शवली आहे. काँग्रेसनं उत्तर प्रदेशमध्ये लढावे तर बंगाल, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात आघाडी करुन लढण्याची आवश्यकता असल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले आहे.

प्रशांत किशोर यांच्या प्रवेशानंतर विरोधी पक्षनेत्यांचे आवाहन

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये आल्यावर सर्वपक्षीय विरोधी पक्षनेत्यांनी जातीय सलोखा राखण्यासाठी आवाहन केलं आहे. असं आवाहन करणाऱ्या पत्रावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यतिरिक्त सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी स्वाक्षरी केली होती. दरम्यान हे पत्र महत्त्वाचे ठरत आहे कारण काँग्रेस आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील संबंध फारसे चांगले नाहीत.

- Advertisement -

हेही वाचा : रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीत स्फोटामुळे कंपनीला भीषण आग, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -