प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट, पंजाब निवडणूकीवर रणनितीची शक्यता

पंजाबच्या निवडणूकीसाठी पक्षात मोठा बदल करण्यात येणार

Prashant Kishor meets Rahul Gandhi, Possibility of strategy on Punjab elections

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली आहे. राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. पंजाबमधील आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असल्याची शक्यता आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी प्रशांत किशोर यांना निवडणूकीसाठी प्रधान सल्लागार म्हणून नयियुक्त केलं आहे. गांधी-किशोर यांची बैठक पंजाब निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर असल्याची शक्यता आहे. या बैठकीला काँग्रेस सचिव प्रियांका गांधी आणि पंजाबचे प्रभारी हरीश रावत तसेच केसी वेणुगोपालही उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस सचिव प्रियांका गांधी यांचा लखनऊ दौरा होता परंतु हा दौरा २ दिवसांकरता रद्द झाला आहे. पंजाबच्या निवडणूकीसाठी पक्षात मोठा बदल करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. उत्तर प्रदेश निवडणूक तसेच पंजाबच्या निवडणूकांबाबत चर्चा करण्यासाठी भेट घेतली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रशांत किशोर हे राजकीय पक्षांसाठी निवडणूक रणनिती आखण्यात मदत करतात. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूकीमध्येही ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी साठी प्रशांत किशोरयांनी रणनिती आखली होती. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) या निवडणूकीत २१३ जागांवर विजय मिळाला आहे. बंगालमध्ये भाजप – टीएमसीमध्ये चांगलीच टक्कर पाहायला मिळाली होती परंतु प्रशांत किशोर यांनी भाजपला १०० पेक्षा जागा मिळणार नसल्याचे सांगितले होते तसेच १०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या तर काम सोडेन असाच इशारादिला होता.

प्रशांत किशोर यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी प्रशांत किशोर यांना प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त केलं आहे. प्रशांत किशोर यासाठी केवळ १ रुपयांचे मानधन घेणार आहेत. पंजाबमध्ये कॅप्टन सरकारमध्ये प्रशांत किशोर यांना मंत्र्यांचा दर्जा देण्यात येणार आहे. यामध्ये त्यांना मंत्र्यांना ज्या शासकीय सवलती देण्यात येतात त्या सर्व सेवा पुरवल्या जाणार आहेत. शासकीय निवास, फोन, वाहतूक सुविधा, पाहुणचार, कार्यालयीन कर्मचारी, स्वीय्य सहाय्यक अशा सर्व सुविधा पंजाब सरकारकडून देण्यात येणार आहेत.

प्रशांत किशोर – शरद पवार भेट 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सुद्धा तीनवेळा प्रशांत किशोर यांनी भेट घेतली आहे. महाराष्ट्रातील शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे पवार-किशोर यांची भेट झाली होती. यानंतर शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानीही पुन्हा दोनवेळा दोघांची भेट झाली होती. यामुळे देशातील राजकर्त्यांच्या नजरा या भेटीकडे वळल्या होत्या. २०२४ च्या निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.