घरताज्या घडामोडीPrashant Kishor : काँग्रेसमुळे माझा ट्रॅक रेकॉर्ड खराब झाला, सोबत काम करणार...

Prashant Kishor : काँग्रेसमुळे माझा ट्रॅक रेकॉर्ड खराब झाला, सोबत काम करणार नाही, प्रशांत किशोरनं फटकारलं

Subscribe

2011 ते 2021 दरम्यान काँग्रेससोबत 11 वेळा काम केले आहे. त्यामध्ये 1 निवडणूकीत पराभव झाला आहे. तेव्हापासून मी पुढे काँग्रेससोबत काम करणार नाही असे ठरवलं असल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले.

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रीय काँग्रेसला फटकारलं आहे. काँग्रेसवर किशोर यांनी निशाणा साधला आहे. जन सुराज यात्रेदरम्यान प्रशांत किशोर माजी केंद्रीय मंत्री आणि समाजवादी नेता स्वर्गीय रघुवंश प्रसाद सिंह यांच्या घरी गेले होते. श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसला चांगलेच सुनावलं आहे. काँग्रेसमुळे माझा ट्रॅक रिकॉर्ड खराब झाला आहे. आता पुन्हा काँग्रेससोबत काम करणार नाही असे हात जोडून प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

प्रशांत किशोर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आतापर्यंत ते फक्त एकच निवडणूक हरले आहेत, ती म्हणजे यूपी विधानसभेची, ज्यामध्ये त्यांनी काँग्रेससाठी काम केले. प्रशांत म्हणाले की, 2011 ते 2021 पर्यंत तो 11 निवडणुकांशी निगडीत होता, ज्यामध्ये फक्त एकच निवडणूक हरली. काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, काँग्रेस असा पक्ष आहे की तो स्वतः सुधारत नाही आणि आम्हालाही बुडवेल अशा शब्दात प्रशांत किशोर यांनी टीका केली आहे.

- Advertisement -

दरम्यान प्रशांत किशोर यांनी बंगालच्या निवडणुकीचा संदर्भ दिला आहे. 2021 मध्ये भाजपसोबत अशी पैज होती की कोण जिंकेल? त्यावेळीसुद्धा सांगितले होते की, माझा पराभव होणार नाही. 100 च्या खाली आकडा असेल परंतु 77 वर थांबेल, माझे मत बरोबर निघाले तेव्हा मला असे वाटले आता काम पुरेसे झाले काहीतरी नवीन करुया असे प्रशांत किशोर म्हणाले.

काँग्रेससोबत काम करणार नाही

काँग्रेस स्वतःमध्ये बदल करत नाही. सुधारणा करत नाही त्यामुळे आमचेसुद्धा नुकसान होत आहे. 2017 मध्ये काँग्रेससोबत काम केले होते. त्यावेळी निवडणूक हारलो होतो. 2011 ते 2021 दरम्यान काँग्रेससोबत 11 वेळा काम केले आहे. त्यामध्ये 1 निवडणूकीत पराभव झाला आहे. तेव्हापासून मी पुढे काँग्रेससोबत काम करणार नाही असे ठरवलं असल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले. तसेच या प्रवासात खूप काही शिकलो असेही ते म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -