घरताज्या घडामोडीसध्या पक्ष स्थापना नाही, आधी जनतेचे प्रश्न समजून घेणार - रणनीतीकार प्रशांत...

सध्या पक्ष स्थापना नाही, आधी जनतेचे प्रश्न समजून घेणार – रणनीतीकार प्रशांत किशोर

Subscribe

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी अद्यापही पक्ष स्थापन करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भविष्यात गरज पडल्यास नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचं देखील संकेत त्यांनी दिले आहेत. बिहारमधील जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी ३ हजार किमीचा प्रवास करणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे. एवढेच नाही तर बिहारमधील जवळपास १७ हजार लोकांना ते भेटणार आहेत. ज्यांच्यामध्ये बिहारचे प्रश्न सोडविण्याची क्षमता असल्यामुळे बिहारमधील बदलाची तळमळ त्यांना लागली आहे.

प्रशांत किशोर यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याचे संकेत ट्विटच्या माध्यमातून दिले होते. मात्र, त्यांनी आपण अद्याप पक्ष स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या त्यांचे लक्ष बिहारच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाशी संबंधित लोकांना भेटणे आहे. त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जाणार आहे.

- Advertisement -

बिहारमध्ये किशोर जवळपास १७ ते १८ हजार लोकांना भेट देणार आहेत. यामध्ये काही लोकांचा सामाजिक आणि राजकीय जीवनाशी संबंध आहे. आगामी काळात अशा लोकांना भेटणार असल्याचे किशोर म्हणाले. ते घरोघरी जाऊन लोकांची भेट घेणार आहेत.

लालू प्रसाद यादव, नितीश कुमार यांच्या राजवटीच्या ३० वर्षानंतरही बिहार हे देशातील सर्वात मागासलेले आणि गरीब राज्य आहे. विकासाच्या अनेक मापदंडांमध्ये बिहार अजूनही देशातील सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. बिहारला आगामी काळात आघाडींच्या राज्यात जायचे असेल तर त्यासाठी नवा विचार आणि प्रयत्न केले पाहीजेत.

- Advertisement -

प्रशांत किशोर ३ हजार किमीची पदयात्रा बिहारमध्ये काढणार आहेत. बिहारच्या रस्त्यांवर आणि परिसरात पोहोचायचे आहे. त्यामुळे लोकांना सार्वजनिक सुरक्षेची संकल्पना सांगायची आहे.

बिहारमध्ये सध्या निवडणूक नाहीये, मात्र निवडणूक लढवण्याचे ध्येय असेल तर निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी पक्ष स्थापन करून निवडणूक लढवू शकतो.

नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहारमधील शिक्षण, आरोग्य, रोजगार व्यवस्था पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे. परंतु नितीश कुमार यांच्यासोबत माझे चांगले संबंध असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. मात्र, प्रत्येक प्रश्नांच्या मुद्द्यावर मी त्यांच्याशी सहमत नसल्याचं देखील पीके म्हणाले.


हेही वाचा : Koregaon Bhima Violence: शरद पवारांना चौकशी आयोगाचा समन्स, कोरेगाव-भीमा प्रकरणी आज देणार साक्ष


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -