घरदेश-विदेशPrashant Kishor : जातीय राजकारणाला मतदार महत्त्व देत नाही - प्रशांत किशोर

Prashant Kishor : जातीय राजकारणाला मतदार महत्त्व देत नाही – प्रशांत किशोर

Subscribe

नितीश कुमार यांनी बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना केले. पण या मुद्यावर बिहारमध्ये मतदान मिळणार नाही, हे लक्ष्यात आल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा भाजासोबत जाण्याचा निर्णय घेतला, अशी टीका त्यांनी केली आहे. 

नवी दिल्ली : जातीय राजकारणाला सर्वसामान्य लोक फार महत्त्व देत नाही, अशी प्रतिक्रिया रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. पंतप्रधान मोदींना त्यांची जातपाहून लोक त्यांना मतदान करत नाही, तर त्यांचे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व पाहूनच लोक मतदान केले होते, असेही प्रशांत किशोर म्हणाले.

बिहारमधील जातीनिहाय जनगणनाला आधार मानून काँग्रेसकडून देशव्यापी जातीनिहाय सर्वेक्षणाची मागणी केली आहे. या प्रश्नावर किशोर कुमार म्हणाले, “देशाच्या राजकारणात एखादा मुद्दा चांगला चालतो, हे वारंवार उगळुता येत नाही. जाती राजकारणाच्या मुद्दा हा मंडल आयोगाच्या वेळी गाजला असून सर्व सामान्यांना फार महत्त्व मिळणार नाही. जातीय राजकारणाला सर्व सामान्य लोक फार महत्त्व देत नाही”, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Vs OBC : छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा; शिंदे गटातील दोन आमदारांची मागणी

पंतप्रधान मोदींची जात पाहून लोक मतदान करत नाही

प्रशांत किशोर म्हणाले, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जातीवर आधारीत राजकारणाची चर्चा अधिक होते. पण लोक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करतात. पण पंतप्रधान मोदींना त्यांची जातपाहून लोक त्यांना मतदान करत नाही, तर त्यांचे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व पाहूनच लोक मतदान केले होते. मोदी हे स्वयंभू नेते आहेत, असे अनेकांचे मत आहे. राहुल गांधी हे घराणेशाहीचे प्रतीक असल्याची मतदारांची भावना आहे आणि मोदी प्रमाणिक आणि काँग्रेस भ्रष्टाचारी असल्याचा समज लोकांचा झाला आहे. नितीश कुमारांवर प्रशांत किशोर म्हणाले, नितीश कुमार यांनी बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना केले. पण या मुद्यावर बिहारमध्ये मतदान मिळणार नाही, हे लक्ष्यात आल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा भाजासोबत जाण्याचा निर्णय घेतला, अशी टीका त्यांनी केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -