घरदेश-विदेशप्रताप बोस महिंद्राचे नवे हेड ऑफ डिझाइन, टाटा मोटर्समध्ये १४ वर्ष केले...

प्रताप बोस महिंद्राचे नवे हेड ऑफ डिझाइन, टाटा मोटर्समध्ये १४ वर्ष केले काम

Subscribe

टाटा मोटर्सला राजीनामा देत प्रताप बोस महिंद्राचे नवीन हेड ऑफ डिझाइन

टाटा मोटर्समध्ये गेली १४ वर्षे ग्लोबस डिझाइन हेड पदावर काम करणारे प्रताप बोस यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता प्रताप बोस महिंद्रामध्ये नवीन हेड ऑफ डिझाइन म्हणून रुजू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते महिंद्राचा एडवांस डिझाइन युके, युरोपिय देशात काम करणार आहेत. महिंद्राने नुकतेच या फॉसिलिटिची घोषणा केली होती.

प्रताप बोस यांनी गेली अनेक वर्षे टाटा मोटर्सचे ग्लोबल डिझाइनचे वॉइस प्रेसिडेंट पद सांभाळले. त्यांनी आत्तापर्यंत टाटा मॉडेल्सचे डिझाइन तयार केले आहेत. टाटा कंपनीच्या अनेक कार्सला अधिक आकर्षक आणि फँन्सी लूक देण्यामागे प्रताप बोस यांचा मोठा वाटा होता. Tiago, Harrier, Nexon आणि Altroz सारख्या मोटर्स भारतीय ग्राहकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे प्रताप बोस यांचा मोटर्स डिझाइनने एकप्रकारे क्रांती आणली होती. अलीकडच्या काळात टाटा मोटर्सने भारतीय ग्राहकांची मने जिंकली असून, टाटाच्या वाहन विक्रीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहन उद्योगात टाटा कंपनीचा दबदबाही वाढताना दिसत आहे.

- Advertisement -

गेली १४ वर्षे त्यांनी टाटा मोटर्समध्ये काम केले. टाटा मोटर्समधील त्यांचा पहिला प्रोजेक्ट सफारी स्टॉर्म होता. मात्र आता नवीन सफारीसह त्यांनी या कंपनीतील आपला प्रवास इथेच थांबवला आहे. महिंद्रा सध्या पॅसेंजर व्हिकल सेगमेंटवर काम करत आहे. तसेच, बोर्न इलेक्ट्रिक स्केटबोर्ड प्लॅटफॉर्म अंतर्गत अनेक नवीन इलेक्ट्रिक प्रोडक्ट तयार करणार आहे. महिंद्रा ग्रुपच्या अंतर्गत प्यूजो मोटारसायकल देखील येते. त्यामुळे बोस यांना या डिझाइनचे काम सांभाळण्याची जबाबदारी मिळू शकते.

दरम्यान प्रताप बोस यांनी सोशल मीडियाद्वारे टाटा मोटर्ससोबतच प्रवास थांबवत असल्याची माहिती दिली.  याबाबत त्यांनी लिहिले की, टाटा मोटर्ससोबतचा १४ वर्षांचा प्रवास खूपच चांगला होता. मात्र, आता कंफर्ट झोन सोडून प्रोफेशनल डिझाइनच्या क्षेत्रात नवीन आव्हानांचा सामना करण्याची वेळ आली आहे. टाटा मोटर्स लिमिटेडमध्ये माझी पहिली असाइनमेंट Safari Storme होती आणि हे पाहणे खूपच आनंदी आहे की आता पूर्ण प्रवास नवीन सफारीच्या लाँचसोबत पूर्ण झाला आहे, अशी प्रतिक्रिया बोस यांनी दिली आहे. रतन टाटा, सायरस मिस्त्री आणि एन चंद्रशेखरन सारख्या तीन चेअरमनसोबत काम करण्याची संधी मिळाली, हे भाग्य असून, Tata Bolt, Zest, Tiago, Tigor, Nexon, HXA, Altroz, Harrier, Safari, HBX, Prima, Signa, Ultra, Intra यांसारख्या गाड्यांसोबतच कॉन्सेप्ट कार्स जसे की, Pixel, Megapixel, Nexon, Racemo, H5X, 45X, H2X, Sierra यादेखील माझ्यासाठी खास आहेत, असे बोस यांनी नमूद केले आहे.

- Advertisement -

Covid-19: कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना होतायत ‘हे’ गंभीर आजार, ऑक्सफर्डचा रिसर्च


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -