प्रयागराज: स्वातंत्र्यदिन आणि प्रजाकसत्ताक दिनाच्या आधीच काही दिवस तिरंगा ध्वजाचा अवमान होणार नाही यासाठी प्रसार माध्यमांतून जनजागृती केली जाते. असे जरी असले तरी काही जण कळत न कळत ध्वजाचा अवमान करतात. अशातच एका मदरश्यामध्ये पाहुण्यांसाठी चक्क तिरंगा ध्वजावर नाश्ता वाढला. या फोटो व्हायरल झाल्यानंतर आयोजकांसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Prayagraj Crime Breakfast raised on tricolor flag in Madrasah A case has been registered against five people)
स्वातंत्र्यदिनी होलागढ येथील मदरशात तिरंग्याच्या अपमानावरून बराच गदारोळ झाला होता. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी येथे आलेल्या पाहुण्यांना टेबलावर तिरंग्याचा कापड टाकून नाश्ता देण्यात आला. त्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर लोक संतप्त झाले आणि त्यांनी गोंधळ सुरू केला. नंतर व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हे दाखल केल्यानंतर लोक शांत झाले.
होलागडच्या दहियावा बाजारमधील गौसिया इस्लामिया जिंतुल उलूम मदरश्यामध्ये स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ध्वजारोहणही करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांना तिरंगा रंग असलेल्या कपड्यावर नाश्ता वाढण्यात आला होता. असा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. स्थानिक नागरिकांनी याप्रकरणी आंदोलन करण्यास सुरूवात केली. यामध्ये दहियावा बाजारातील व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून आंदोलन करणाऱ्या नागरिकांना कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले.
हेही वाचा : मांजरीला खाऊ न देणाऱ्या कुत्र्याच्या अंगावर महिलेने फेकले चक्क Acid; आरोपीला अटकेत
यांच्यावर करण्यात आला गुन्हा दाखल
याप्रकरणी पवन जैस्वाल यांच्यासह व्यापारी संघटनेच्या सदस्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन मदरश्याचे प्रबंधक तौआब अंसारी, नन्हे कुरेशी, दहियावा बाजारातील रहिवासी कुलदीप केसरवानी, संजय केसरवानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : Nanded Crime : हसण्याच्या कारणावरून झाला वाद, विक्रेत्याने तरुणाचे छाटले हात
गाडीवर तिरंगा लावून केला स्टंट, व्हिडिओ व्हायरल
स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर जोशांचे भान हरपल्याचे प्रकरणही समोर आले. नवीन यमुना पुलावर तिरंगा ध्वज असलेल्या कारच्या छतावर एक तरुण स्टंट करताना दिसला. कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. सोबतच याप्रकरणी तक्रारही करण्यात आली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे तरुणाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे किडगंज पोलिसांनी सांगितले.